मुंबई, 25 नोव्हेंबर- यंदाच्या हिंदी बिग बॉसच्या 15 व्या (Bigg Boss 15) पर्वाला म्हणावा तेवढा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही. शोचा घसरलेला टीआरपी विचारत घेता निर्माते देखील चिंतेत आहेत. नुकतीच बिग बॉसच्या घऱात प्रेस कॉन्फ्रंस झाली. यानंतर शोमध्ये काही बदल दिसून येत आहेत. यानंतर घऱात वाईल्ड कार्ड स्पर्धाकांची एंट्री करण्याचा निर्णय शोच्या निर्मात्यांनी घेतला आहे. घऱात मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले एंट्री करणार होता मात्र आता त्याची एंट्री देखील पुढे ढकल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, प्रत्येक स्पर्धकाला बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी काही दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर, घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी म्हणजेच आरटीपीसीआर चाचणी केली जाते आणि या चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना सेटवर जावे लागते आणि त्यानंतर अँटीजेन चाचणी करून बिग बॉसच्या घरात प्रवेश करावा लागतो.
वाचा : It's Official! मराठी टेलिव्हिजनवर सलमान खान, Bigg Boss Marathi च्या चावडीवर भाईजानची एंट्री
अभिजित बिचुकलेची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अभिजित बिचुकलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यामुळे वाइल्ड कार्ड एंट्रीसाठी खूप वेळ लागत आहे. रश्मी देसाई आणि देवोलिनासोबत अभिजीत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. पण आता राखी सावंतला घरामध्ये प्रवेश करण्यासाठी निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. राखीने देखील या शोमध्ये सहभागी होण्यासाठी 'हो' म्हटले आहे. अभिजीतला आता त्याच्या प्रवेशाची वाट पाहावी लागणार आहे. शोमध्ये त्याचा समावेश करायचा की नाही याबाबत निर्माते निर्णय घेत आहेत. सध्या तरी त्यांची एंट्री थांबवल्याची माहिती समोर आलेली आहे. ‘बिग बॉस 15’च्या मेकर्ससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आधीच टीआरपीच्या शर्यतीत ‘बिग बॉस 15’ पिछाडला आहे. अशात टीआरपी वाढवण्यासाठी मेकर्स वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत.
वाचा : ज्याचे चित्रपट भाड्याने टीव्ही आणून पाहिले, त्या रिअल भिडूसोबत रवी जाधव करणार काम
2 स्पर्धक शोमधून बाहेर पडणार
बिग बॉस 15 सध्या एक रंजक वळण घेत आहे ज्यामध्ये बॉटम 6 स्पर्धक डेंजर झोनमध्ये आहेत. आजच्या आणि उद्याच्या एपिसोडमध्ये दोन स्पर्धकांना शोमधून बाहेर काढले जाईल. शोमधील टॉप 5 स्पर्धकांपैकी एक निश्चित केला जाईल, त्यानंतर प्रेक्षकांच्या थेट मतदानाद्वारे एक स्पर्धक निश्चित केला जाईल. सिंबा नागपालला शोमधून आऊट झाल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. तर उमर रियाझ, जय भानुशाली, राजीव अदातिया, विशाल कोटियन आणि नेहा भसीन यापैकी एकजण घराबाहेर जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Entertainment, Salman khan