Home /News /entertainment /

Bigg Boss 14: सलमानच्या 'त्या' वाक्यामुळे राहुलच्या चेहऱ्यावर वाजले बारा

Bigg Boss 14: सलमानच्या 'त्या' वाक्यामुळे राहुलच्या चेहऱ्यावर वाजले बारा

बिग बॉस 14 (Bigg Boss14)च्या घरामध्ये सलमान खानने (Salman Khan) दिशाच्या विषयावरुन राहुल वैद्यची (Rahul Vaidya) चांगलीच फिरकी घेतली. यावेळी राहुलच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजले होते.

    मुंबई, 16 नोव्हेंबर: बिग बॉस 14 (Bigg Boss14)च्या घरामध्ये सध्या बऱ्याच मजेदार गोष्टी सुरू आहेत.विकेंडचा वार जर तुम्ही मिस केला असेल तर तुमच्यासाठी खास बातमी. रविवारच्या एपिसोडमध्ये सलमान खान (Salman Khan)ने दिशा परमार (Disha Parmar) प्रकरणावरुन राहुल वैद्यची (Rahul Vaidya) चांगलीच फिरकी घेतली. दबंग सलमान खानचं म्हणणं ऐकून राहुलचं टेंशन मात्र काही काळासाठी हाय झालं होतं. सलमानने राहुलला विचारलं, दिशा परमारकडून काही उत्तर आलं का? त्यावेळी राहुलने नाही असं उत्तर दिलं. त्यावर सलमान म्हणाला, ‘कसं येईल? ती सध्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत थायलंडला आहे.’ सलमान खानने केलेली मस्करी ऐकून घरातल्या इतर स्पर्धकांना हसू आवरलं नाही. पण राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजलेले दिसत होते. सल्लूमियाँने केलेली मस्करी काळी वेळासाठी राहुलला खरीच वाटली, ‘तुम्ही मला काहीही बोला पण असलं काहीतरी सांगू नका. दिशा खरंच तिच्या बॉयफ्रेंडसोबत आहे?’ असा प्रश्न राहुलने सलमानला विचारला. तेव्हा सलमान म्हणाला, ‘थायलंडसारख्या ठिकाणी कोणी आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत जातं का?’ त्यानंतरही सलमानची मस्करी करण्याची हौस संपली नाही. त्याने क्रिएटिव्ह टीमसोबत बोलत असल्याचं नाटक केलं. आणि राहुलला स्टोअर रुममध्ये बोलवलं. राहुल आणि इतर स्पर्धकांना वाटायला लागतं की, स्टोअर रुममध्ये दिशा उभी असेल किंवा दिशाने प्रपोजलला काही उत्तर दिलं असेल पण स्टोअर रुममध्ये दिशाही नव्हती आणि दिशाबाबत काही उत्तरही नव्हतं. स्टोअर रुममध्ये एका टास्कसाठी रसगुल्ले ठेवले होते. राहुलने दिशा परमारला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाची मागणी घातली होती. दिशाने त्यावर अजूनही काहीही उत्तर दिलेलं नाही. आता दिशा राहुलच्या प्रपोजलला कधी उत्तर देणार? ती स्वत: गेस्ट म्हणून बिग बॉसमध्ये येणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bigg boss

    पुढील बातम्या