Home /News /entertainment /

Bigg Boss14च्या घरात नवा ट्विस्ट; राहुल वैद्य 'खास व्यक्तीला' करणार प्रपोज

Bigg Boss14च्या घरात नवा ट्विस्ट; राहुल वैद्य 'खास व्यक्तीला' करणार प्रपोज

Big Boss 14च्या घरात राहुल वैद्यमुळे (Rahul Vaidya) एक नवा ट्विस्ट येणार आहे. एका खास व्यक्तीला तो चक्क नॅशनल टेलिव्हिजनवरुन प्रपोज करणार आहे.

    मुंबई, 10 नोव्हेंबर: बिग बॉस (Big Boss 14)च्या घरातली उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्पर्धक हळुहळु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलायला लागले आहेत. जान सानू (Jaan Sanu)शी झालेल्या मोठ्या वादानंतर आता राहुल वैद्य (Rahul Vaidya)  पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण तो नॅशनल टेलिव्हिजनवरुन आपल्या प्रेमाची कबुली देण्याची शक्यता आहे. बिग बॉसच्या अनसीन व्हिडीओमध्ये राहुल वैद्य कविता कौशिक आणि जस्मीन भसीन यांच्यासोबत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाद्दल बोलत होता. अनसीन व्हिडीओमध्ये राहुल वैद्य म्हणतो, '11 नोव्हेंबरला एका स्पेशल व्यक्तीला मी प्रपोज करणार आहे. त्या व्यक्तीचा वाढदिवसदेखील 11 नोव्हेंबरलाच असतो.' यावरुन अंदाज बंधता येईल की, तो आपल्या कथित गर्लफ्रेंड दिशा परमारबद्दल बोलत आहे. दिशा परमारचा वाढदिवसही 11 नोव्हेंबरलाच आहे. राहुल आणि दिशाची चांगली मैत्री आहे. कोण आहे दिशा परमार? दिशा परमार अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने स्टार प्लसच्या 'प्यार का दर्द है. मीठा मीठा प्यारा प्यारा' या सीरिअलमध्ये 'पंखुडी' हे पात्र साकारलं होतं. तिने काही मॉडेलिंगचे प्रोजेक्टसही केले आहेत. राहुल वैद्यने आधी सांगितलं होतं की, 'दिशा परमार माझी फक्त चांगली मैत्रीण आहे. आम्ही कधीही एकमेकांच्या प्रेमात नव्हतो. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत मी जेवयला, फिरायला जात असतो' पण दिशा परमार प्रसिद्ध झाल्यापासून तिचं आणि राहुलचं नाव एकमेकांशी जोडलं जात आहे. राहुल म्हणाला होता, 'आम्ही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले की, लोकं आमच्याबद्दल चर्चा करायला लागतात. राहुल आणि दिशाने एक म्युझिक व्हिडीओदेखील एकत्र केला केला. आता राहुल खरंच दिशाला प्रपोज करणार का? की बिग बॉसच्या घरातल्या कोणाशी रिलेशनमध्ये येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bigg boss

    पुढील बातम्या