Bigg Boss 14 च्या नव्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड

Bigg Boss 14 च्या नव्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड

Bigg Boss 14 च्या प्रीमियर एपिसोडचे शूटिंग 1 ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. मात्र त्याआधीत बिग बॉस 14 च्या घराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : बिग बॉस  (Bigg Boss)च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी बिग बॉस 14 चा पहिला एपिसोड ऑन एअर जाणार आहे. दरम्यान यावेळी तडका लावण्यासाठी या सीझनमध्ये कोण कोण असणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता तर आहेच पण त्याचबरोबर यावेळी बिग बॉसचे आलीशान घर कसे असणार, असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे यावेळी बिग बॉसचे घर फिल्मसिटीमध्येच बनवण्यात आले आहे. शोच्या प्रीमियर एपिसोडचे शूटिंग 1 ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. मात्र त्याआधीत बिग बॉस 14 च्या घराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

बिग बॉस 13 हा आतापर्यंतच्या सर्व सीझनमधील हिट सिझन आहे. त्यामुळे यंदा काय नवीन अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. इन्स्टाग्रामवर काही फोटो व्हायरल होत आहेत.  Mr Khabri_official या इन्स्टाग्राम पेजने हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये बिग बॉसच्या घराची झलक पाहायला मिळते आहे.

(हे वाचा-'आम्ही एकाच गोष्टीसाठी लढतोय...', एक्स बॉयफ्रेंडने दिला कंगनाला पाठिंबा)

यात बेडरूम, वॉशरूम, कॅप्टन रूम याबरोबरच लिव्हिंग रुम देखील आहे, तर चंदेरी रंगाचे सोफे दिसत आहेत. सर्व काही ग्रँड असल्याचे या फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे. बिग बॉस 14 च्या घरातील हे फोटो असल्याचा दावा या पेजकडून करण्यात येत आहे.

नेहमीप्रमाणे बिग बॉस सुरू होण्याआधीच काही नावांची चर्चा रंगली आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार नैना सिंह, जस्मिन भसीन, करण पटेल, निशांत मलकानी, एजाज खान, राहुल वैद्य, सारा गुरपाल, शगुन पांडे, प्रतीक सेजलपाल आणि जान कुमार सानू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान कोणाची नक्की एंट्री होणार हे 3 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल. यावर्षी शोमध्ये सहभागी होण्याआधी स्पर्धकांना कोव्हिड टेस्ट करावी लागणार आहे.

(हे वाचा-कशा अवस्थेत सापडला होता दिशाचा मृतदेह?रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला हा खुलासा)

दरम्यान अशी देखील माहिती मिळते आहे की यावर्षी नवीन कंटेस्टंटसह काही जुने स्पर्थक देखील दिसणार आहेत. या यादीमध्ये सिद्धार्थ शुक्ला, हिना खान, गौहर खान, मोनालिसा, शहनाज कौर गिल यांची नाव आघाडीवर आहेत. ते कलाकार 2 आठवड्यांसाठी बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 19, 2020, 11:23 AM IST

ताज्या बातम्या