मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बिग बॉस फेम राहुल वैद्यचं Facebook अकाऊंट हॅक; पोस्ट झाले विचित्र VIDEO

बिग बॉस फेम राहुल वैद्यचं Facebook अकाऊंट हॅक; पोस्ट झाले विचित्र VIDEO

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) चा स्पर्धक होता. या कार्यक्रमात त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये सुद्धा कमालीची वाढ झाली आहे.

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) चा स्पर्धक होता. या कार्यक्रमात त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये सुद्धा कमालीची वाढ झाली आहे.

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) चा स्पर्धक होता. या कार्यक्रमात त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये सुद्धा कमालीची वाढ झाली आहे.

मुंबई, 6 मे- गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) सध्या ‘खातरों के खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi 11) च्या तयारीत बिझी आहे. अशातच राहुल वैद्यचं फेसबुक अकाऊंट हॅक(Rahul's Facebook acount Hack) झाल्याची माहिती समोर आली आहे. राहुल ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) चा स्पर्धक होता. या कार्यक्रमात त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये सुद्धा कमालीची वाढ झाली आहे.

काही तासांपूर्वी राहुलच्या फेसबुक पेज काही विचित्र व्हिडीओ पोस्ट करण्यात येत होते. ते पाहून चाहत्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं होतं. मात्र ही बाब लक्षात येताच राहुलने सांगितलं आहे, की हे व्हिडीओ त्यानं पोस्ट केले नाहीत. तर हे एका हॅकरचं काम आहे.

त्यानंतर राहुल वैद्यने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं फेसबुक अकाऊंटबद्दल सांगितलं आहे. स्टोरी पोस्ट करत म्हटलं आहे, ‘माझा फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आला आहे. त्यामुळे माझ्या फेसबुक अकाऊंटवर पाठवण्यात येणाऱ्या विचित्र व्हिडीओकडे दुर्लक्ष करा. कारण ते मी नव्हे तर हॅकर पोस्ट करत आहेत’. मी लवकरात लवकर अकाऊंट परत मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

(हे वाचा:कोरोना काळात हॉलिवूडही भारतासाठी सरसावलं; आता जेनिफर अनिस्टनने केलं मदतीचं आवाहन )

बिग बॉसमुळे राहुल वैद्य खुपचं चर्चेत आला आहे. राहुलला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. त्यामुळेच राहुलला ‘ खातारों के खिलाडी 11’ साठी साईन करण्यात आलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे राहुल या कार्यक्रमातील सर्वात महागडा स्पर्धक ठरला आहे. या कार्यक्रमात राहुलला एका एपिसोडसाठी 12 ते 15 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच राहुल दिशा परमार सोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असतो. दिशा आणि राहुलचा यांचा एक अल्बम नुकताच रिलीज झाला होता. तसेच या जोडीला ‘नच बलिये’ या शोसाठी देखील विचारण्यात आलं होतं. मात्र राहुलने त्याला नकार दिला. कारण हे दोघेही आत्ता लग्नं करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र राहुल आणि दिशाने लग्नाच्या तारखेबद्दल अजून कोणताच खुलासा केलेला नाही.

First published:

Tags: Bigg boss, Facebook, Instagram post, Marathi entertainment