Home /News /entertainment /

‘लहानपणी माझं लैंगिक शोषण झालं होतं’ Bigg Boss 14च्या घरात एजाज खानचा गौप्यस्फोट

‘लहानपणी माझं लैंगिक शोषण झालं होतं’ Bigg Boss 14च्या घरात एजाज खानचा गौप्यस्फोट

अभिनेता एजाज खानने (Eijaz Khan) लहानपणी माझ्यावर लैंगिक शोषण झाल्याचा गौप्यस्फोट बिग बॉस 14च्या (Bigg Boss 14) घरामध्ये केला आहे.

  मुंबई, 30 नोव्हेंबर: बिग बॉस 14 (Bigg Boss 14) हा रिअ‍ॅलिटी शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. स्पर्धकांना नेहमी वेगवेगळे टास्क दिले जातात. या टास्कमुळे काही वेळा स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातल्या अतिशय रहस्यमय गोष्टीही जगासमोर आणाव्या लागतात. अनेक वर्ष मनात दवडून ठेवलेली गुपितं सर्वांना सांगताना स्पर्धक अनेकदा दु:खी होतात. बिग बॉसमध्ये नुकताच असा एक टास्क देण्यात आला ज्यामुळे एजाज खान (Eijaz Khan)  आणि रुबिना दिलेक (Rubina Dilaik) यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला भयंकर प्रसंग सर्वांना सांगितला आहे. बिग बॉसने इम्युनिटी स्टोन मिळवण्यासाठी हा टास्क दिला होता. टास्कनुसार, स्पर्धकांना आपल्या आयुष्यात कोणालाही न सांगितलं एक गुपित सगळ्यांसमोर सांगायचं असतं. त्यावेळी एजाज खानने, ‘माझ्यावर लहानपणी लैंगिक शोषण झालं’ असा गौप्यस्फोट कॅमेऱ्यासमोर केला. आपल्या आयुष्यात घडलेली ती घटना सगळ्यांना सांगताना एजाजला रडू आवरत नव्हतं पण त्याने स्वत:बद्दल ही माहिती दिली. हे ऐकून सगळ्याचं स्पर्धकांचं मन हेलावून गेलं.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  एजाजने सांगितलेल्या प्रसंगानंतर आता इम्युनिटी स्टोन त्याला मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. केवळ एका इम्युनिटी स्टोनसाठी त्याने एवढं मोठं गुपित सांगितल्याबद्दल त्याला ट्रोलही केलं जात आहे. हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं काहींचं म्हणणं आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bigg boss, Sony tv

  पुढील बातम्या