Home /News /entertainment /

'बिग बॉस'फेम राहुल वैद्यला मिळतेय जीवे मारण्याची धमकी; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

'बिग बॉस'फेम राहुल वैद्यला मिळतेय जीवे मारण्याची धमकी; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

'बिग बॉस 14'चा (Bigg Boss 14 Runner up) उपविजेता ठरलेला राहुल वैद्य (Rahul Vaidya) एक अतिशय लोकप्रिय गायकसुद्धा आहे.

  मुंबई,15ऑक्टोबर- 'बिग बॉस 14'चा (Bigg Boss 14 Runner up)  उपविजेता ठरलेला राहुल वैद्य (Rahul Vaidya) एक अतिशय लोकप्रिय गायकसुद्धा आहे. नवरात्रीच्या सुरुवातीला, त्याचं एक नवरात्री स्पेशल (Navratri Special Song) गाणं 'गरबे की रात' रिलीज झालं आहे. या गाण्यात त्यांनं 'श्री मोगल मा'चा उल्लेख केला आहे ज्यांची गुजरातमध्ये पूजा केली जाते. गाण्यात आई मोगल देवीच्या नावाचा वापर त्यांच्या काही भक्तांना योग्य वाटला नाही.यानंतर लोकांनी गाण्यासह राहुल वैद्यलाही विरोध करण्यास सुरुवात केली आहे. राहुलला अनेक मेसेज आणि धमकीचे फोन येत आहेत, ज्यात लोक त्याला देवीचे नाव काढून टाकण्यास सांगत आहेत. काही लोक वेगवेगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्मवर येऊन या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
  राहुल वैद्यच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितलं आहे, 'हो हे खरं आहे, काल रात्रीपासून फोन आणि मेसेजची संख्या वाढली आहे. यामध्ये लोक राहुल वैद्यला मारहाण करण्याची आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची धमकी देत आहेत. पण आम्ही या गाण्यामध्ये देवी आईचं नाव अत्यंत आदराने घेतलं आहे. यामधून आम्हाला कोणच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र जर या गाण्यातील देवी आईच्या नावाच्या उल्लेखाने एखाद्या विशिष्ट समूहाच्या भावना, तर आम्ही त्याच्या विचारांचा मन ठेवतो. आणि आमच्या स्तरावर आम्ही हे सर्व ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. (हे वाचा:Bigg Boss 15: बिग बॉस स्पर्धक जय भानुशालीच्या मुलीला पाहिलंय का? दिसतेय सुपर....) प्रवक्ताने पुढं म्हटलं, “आम्ही सर्वांना विनंती करतो की आम्हाला काही दिवस द्या, कारण ज्या व्यासपीठावर आम्ही गाणं रिलीज केलं आहे त्यात सुधारणा करण्यासाठी किमान काही दिवस लागतील. आम्ही प्रत्येकाच्या भावनांचा आदर करतो, ज्यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे. आम्ही ती सुधारण्याच्या दिशेने काम करत आहोत.” (हे वाचा:बॉलिवूडची बोल्ड क्वीन Malaika Aroraसोबत घडला 'Oops Moment'; फोटो झाले VIRAL) 'गरबे की रात' हे गाणं राहुल वैद्य आणि भूमी त्रिवेदी यांनी गायलं आहे. 8 ऑक्टोबर रोजी हे गाणे रिलीज झालं होतं. निया शर्मा आणि राहुल वैद्य यांनी या म्युझिक व्हिडिओमध्ये परफॉर्म केलं आहे. निया आणि राहुल वैद्य गाण्याच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस 15' च्या पहिल्या वीकेंड का वार भागात सहभागी झाले होते. कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या गाण्यावर गरबाही केला होता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment

  पुढील बातम्या