Home /News /entertainment /

‘Bigg Boss OTT’मध्ये होणार निक्की- रुबिनाची एन्ट्री; पुन्हा करणार धम्माल

‘Bigg Boss OTT’मध्ये होणार निक्की- रुबिनाची एन्ट्री; पुन्हा करणार धम्माल

तसेच या आठवड्यात छोट्या पडद्यावरील बोल्ड क्वीन निया शर्माची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

  मुंबई, 5 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस होय. गेल्यावर्षी ‘बिग बॉस 14’(Bigg Boss 14) मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांमधील एक म्हणून अभिनेत्री निक्की तांबोळी आणि रुबिना दिलैकला(Nikki Tamboli) ओळखलं जातं. निक्कीने फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र तिला विजेती बनता आलं नव्हतं. ती रनर अप ठरली होती. तर रुबिना त्या सिझनची विजेती ठरली होती. सध्या खूपच इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे. बिग बॉसचा नवा सिझन बिग बॉस OTT’(Bigg Boss OTT) मध्ये रुबिना दिलैक आणि निक्की तांबोळीची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच यावेळी तिची एन्ट्री खूपच खास असल्याचंदेखील म्हटलं जात आहे.
  निक्की तांबोळी आणि रुबिना दिलैक संडे का वारमध्ये होस्ट करण जोहरसोबत सहभागी होणार आहेत. इतकचं नव्हे तर नंतर स्पर्धकांसोबत टास्क करण्यासाठी घरामध्येसुद्धा दाखल होणार आहेत. सध्या बिग बॉसचा नवीन व्हर्जन प्रेक्षकांना दाखवला जात आहे. यावेळी ‘बिग बॉस’ OTTच्या स्वरुपात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आत्तापर्यंत बिग बॉस OTTमध्ये हिना खान, मलायका अरोरा, सनी लियोनी, राखी सावंत अशा अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. यानंतर आता निक्कीच्या नावाची चर्चा सुरु आहे. (हे वाचा: एअरपोर्टवर Bra घालून हजेरी लावलेल्या उर्फी जावेदचं स्पष्टीकरण, म्हणाली...) तसेच या आठवड्यात छोट्या पडद्यावरील बोल्ड क्वीन निया शर्माची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. नियाच्या येण्याने घरात बोल्डनेसचा तडका लागला आहे. आत्ता रुबिना आणि निक्कीच्या येण्याने पुन्हा शोमध्ये काहीतरी मनोरंजक पाहायला मिळणार हे नक्की. कामाबद्दल सांगायचं झालं तर निक्की नुकताच ‘खतरों के खिलाडी’ मध्ये सहभागी झाली होती. तर रुबिना आपल्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg Boss OTT, Entertainment

  पुढील बातम्या