Bigg Bossमध्ये होणार 'हे' बदल, सलमानच्या मानधनापासून ते थीमपर्यंत सर्वच चर्चेत

Bigg Bossमध्ये होणार 'हे' बदल, सलमानच्या मानधनापासून ते थीमपर्यंत सर्वच चर्चेत

टीव्हीवरील सर्वाधिक वादात राहणारा शो बिग बॉसचा 13 वा सीझन लवकरच प्रेक्षाकांच्या भेटीला येत आहे.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : सध्या टीव्हीवर रिअलिटी शोचा बोलबाला आहे. अशातच आता टीव्हीवरील सर्वाधिक वादात राहणारा शो बिग बॉसचा 13 वा सीझन लवकरच प्रेक्षाकांच्या भेटीला येत आहे. या सीझनबाबत प्रेक्षाकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. या शोच्या यंदाच्या सीझनमध्ये बरेच बदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. हे बदल या सीझनला आणखी रंजक बनवतील असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. टीआरपी लिस्टमध्ये टॉपचं स्थान पटकावण्यासाठी निर्मात्यांचे हे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. तसेच सलमान खान सुद्धा प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाही आहे.

इंडिया टुडेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या सीझनमध्ये शोला मसालेदार बनवण्यासाठी यात अनेक बदल केले जाणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉसचा 13 सीझन 29 सप्टेंबरला सुरू होणार आहे. यावेळी शोची थीम ‘हॉरर’ असेल असं बोललं जात आहे. तसेच यंदाच्या या सीझनमध्ये कोणतेही कॉमनर्स असणार नाहीत यावेळी टक्कर फक्त सेलिब्रिटींमध्येच होणार आहे. शोच्या फॉरमॅटमधील हे बदल टीआरपी वाढवण्याच्या उद्देशानं करण्यात आले आहेत.

तनुश्री दत्ताच्या निशाण्यावर आता बॉलिवूडमधला 'हा' मोठा हिरो, म्हणाली...

बिग बॉसचा आवाज बदलणार

13 व्या सीझनमधील सर्वात रंजक गोष्ट ही असणार आहे की, यावेळी या शोमध्ये बिग बॉसचा आवाज बदललेला ऐकू येऊ शकतो. यंदा प्रेक्षाकांना फिमेल बिग बॉस आवाज ऐकू येण्याची शक्यता आहे. याआधी या शोसाठी अतुल कपूर ‘बिग बॉस चाहते हैं’ ही कमांड देताना ऐकू येत असत. मात्र यावेळी फिमेलचा आवाज ऐकू येईल असं बोललं जात आहे. याशिवाय सलमानसोबतही फिमेल होस्ट दिसण्याची शक्यता आहे.

रानू मंडल यांचं पहिलं गाणं लाँच, भर कार्यक्रमात हिमेश रेशमियाला कोसळलं रडू

या सर्व गोष्टींबाबत बिग बॉसच्या निर्मात्यांकडून कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या शोमध्ये कोणकोणत्या गोष्टी नव्या घडणार आहेत हे येणाऱ्या काळातच समजेल या अगोदर सलमान खानच्या होस्टिंगच्या मानधनाबाबत काही वृत्त प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यात संपूर्ण सीझनसाठी सलमाननं 400 कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जात होतं. याशिवाय शोच्या प्राइजमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

या सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा

बिग बॉस 13च्या स्पर्धकांबद्दल बोलायचं तर या सीझनमध्ये चंकी पांडे, राजपाल यादव, वरीना हुसैन, टीवी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी, अंकिता लोखंडे, राकेश वशिष्ठ, माहिका शर्मा, डैनी डी, जीत, खासदार चिराग पासवान, बॉक्सर विजेंद्र सिंह, राहुल खंडेलवाल, मेघना मलिक, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती, दयानंद शेट्टी, फैजी बू, सोनल चौहान, सिद्धार्थ शुक्ला यांची नावं समोर आली आहेत. याशिवाय राखी सावंत आणि दीपक कल्लाल यांच्या नावांचीही चर्चा आहे.

मलायका अरोरानं शेअर केला Throwback बिकिनी फोटो, युजर्स म्हणाले...

==============================================================

VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार

Published by: Megha Jethe
First published: September 14, 2019, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading