Bigg Boss 13 : स्पर्धकानं घेतलं ऐश्वर्याचं नाव, अशी होती सलमान खानची प्रतिक्रिया

Bigg Boss 13 : स्पर्धकानं घेतलं ऐश्वर्याचं नाव, अशी होती सलमान खानची प्रतिक्रिया

सलमान खान आणि ऐश्वर्याचं अफेअर आणि ब्रेकअप आता कोणालाच नवं नाही.

  • Share this:

मुंबई, 06 ऑक्टोबर : रिअलिटी शो 'बिग बॉस' हा टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो मानला जातो. या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही गोंधळ हमखास पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच या शोच्या 13 व्या सीझनला सुरुवात झाली. त्यानंतर नुकताच या शोमध्ये आठवड्याच्या शेवटी विकेंड का वारमध्ये सलमान खान स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसला. स्पर्धकांकडून संपूर्ण आठवड्यात घडलेल्या घटनांचा आढावा घेत असताना एक वेळ अशी आली सलमान खान काहीसा त्रासलेला दिसला आणि याचं कारण होत ऐश्वर्या राय बच्चन.

सलमान खान आणि ऐश्वर्याचं अफेअर आणि ब्रेकअप आता कोणालाच नवं नाही. पण बिग बॉसच्या घरात एका स्पर्धकानं ऐश्वर्याचं नाव घेतलं आणि सलमानच्या कपाळावर आठी उमटली. शनिवारी झालेल्या विकेंड का वारमध्ये सलमाननं स्पर्धकांना विचारलं की, घरात सर्वात स्ट्रॉन्ग बॉन्डिंग कोणाचं आहे. त्यावर शहनाझ गिल आणि पारस छाब्रा यांचं नाव जवळपास सर्वांनी घेतलं. त्यानंतर सिद्धार्थ डेला चिडवत सलमाननं म्हटलं तु यांच्यामध्ये का येत आहेस?

KBC-11 : स्पर्धकाचा प्रश्न ऐकून बिग बींची बोलती बंद, प्रेक्षकही झाले अवाक

यावर सिद्धार्थ म्हणाला, सर तुमचा सिनेमा हम दिल दे चुके सनममध्ये शेवटी ऐश्वर्या रायला तर अजय देवगणच घेऊन जातो ना. मी-अजय देवगण, पारस-सलमान खान आणि शहनाझ पंजाबची कतरिना नाही तर ऐश्वर्या राय आहे. पण सिद्धार्थची ही मस्करी सलमानला फारशी आवडलेली दिसत नाही त्याचं हे बोलणं ऐकून तो थोडासा नाराज झालेला दिसतो.

पहिल्याच आठवड्यात Bigg Boss 13 बंद करण्याची मागणी, समोर आलं धक्कादायक कारण

याशिवाय सलमाननं शेफाली बग्गानं घराची क्वीन होण्यासाठी स्वतःचं नाव दिलं हा तिचा निर्णय बरोबर असल्याचं सांगत तिचं कौतुक केलं. सलमान म्हणाला की बरं झालं की तू बाकीच्यांसारखं चाल नाही चाललीस. यानंतर त्यानं रश्मि देसाई आणि देवोलिना भट्टचार्य यांनाही फटकारलं.

रॅप साँगवर अमिताभ बच्चन यांनी केला डान्स, रणवीर सिंह म्हणतो...

==========================================================================

VIDEO : अंग गोठवणाऱ्या थंडीत वर्षभर राहणाऱ्या नवदुर्गेचा अनुभव

First published: October 6, 2019, 4:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading