Home /News /entertainment /

Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्ला-शाहनाझ गिल करणार लग्न? वडीलांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्ला-शाहनाझ गिल करणार लग्न? वडीलांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

शहनाझच्या वडीलांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  मुंबई, 03 डिसेंबर : बिग बॉसच्या 13 व्या पर्वात प्रत्येक दिवशी काही ना काही नवा वाद होताना दिसत आहे. प्रत्येक दिवशी या घरातले सदस्य एकमेकांवर ओरडताना दिसतात. पण या सगळ्यात घरात आणखी एका गोष्टीची चर्चा असते. ते म्हणजे शहनाज गिल आणि सिदार्थ शुक्ला यांच्यातील गोड मैत्रीची. या दोघांमध्ये मैत्री पेक्षा जास्त काहीतरी असल्याचं सर्वांनाच जाणवतं. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघं लग्न करणार का अशी चर्चा आता सगळीकडे सुरू आहे. सुरुवातीला सिद्धार्थला चांगला मित्र म्हणणारी शहनाझ आता त्याच्याबाबत गंभीर असल्याचं दिसून येत आहे. एवढंच नाही तर बोलता बोलता तिनं सिद्धार्थशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर आता या दोघांच्या नात्यावर शहनाझच्या वडीलांची शॉकिंग प्रतिक्रिया आली आहे. बिग बॉसच्या घरात अनेकदा सिद्धार्थ रागात असताना शहनाझ त्याला शांत करताना दिसली होती. दोघंही नेहमीच एकमेकांची काळजी घेताना दिसली होती. त्यामुळे घरातील त्यांची केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहतेही त्यानां सपोर्ट करताना दिसत आहेत. या दोघांचा वेगळा चाहता वर्गही तयार झाला आहे. या दोघांमधील वाढती जवळीक पाहता शहनाझच्या वडीलांची प्रतिक्रिया सुद्धा आता समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी या दोघांच्या नात्याला पाठिंबा दिला आहे. कुशल पंजाबी आत्महत्या: वडिलांचा मोठा खुलासा, सांगितलं काय झालं होतं त्या रात्री शहनाझच्या वडीलांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात ते सांगताना दिसत आहेत की, या नात्याबद्दल त्या दोघांनाच माझ्यापेक्षा जास्त समजतं. त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे आणि दोघंही एकमेकांना नीट समजून घेतात. जर या दोघांमध्ये लव्ह अँगल सुरू होत असेल तर तर तो त्या दोघांचा निर्णय असेल. मला त्यांच्या नात्या बद्दल काहीच समस्या नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जर त्या दोघांना लग्न करायचं असेल तरीही माझा त्यांना पाठिंबा असेल. सिद्धार्थ एक समजूतदार मुलगा आहे. भला माणूस आहे. बिग बॉसमध्ये प्रत्येक वेळी तो स्टँड घेताना दिसतो आणि तो मला आवडतो.’ अशाप्रकारे सिद्धार्थ-शहनाझच्या नात्याला आता तिच्या वडीलांकडूनही होकार मिळाला आहे. जान्हवी कपूरला आहे या गोष्टीचं 'व्यसन', 'धडक गर्ल' असा सांभळते Fitness
  घराच्या बाहेर सिद्धार्थ-शहनाझच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू असली तरीही घरात मात्र त्याच्यात दुराव निर्माण केल्याचे प्रयत्न केले जात आहेत. बिग बॉसच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये शेफाली बग्गा आणि विशाल आदित्य सिंह शहनाझला सिद्धार्थच्या विरोधात भडकवताना दिसत आहेत. शहनाझ सुद्धा सिद्धार्थच्या बोलण्यानं दुखावली गेली आहे. कॉन्सर्ट सुरू असतानाच नाचता नाचता फाटली रणवीरची पँट; दीपिकाने काय केलं पाहा
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bigg boss, Salman khan

  पुढील बातम्या