मुंबई, 12 नोव्हेंबर : अभिनेता सलमान खानचा जलवा फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावरही कायम आहे. सध्या सलमान टीव्ही शो बिग बॉसमध्ये दिसत आहे. मागच्या संपूर्ण आठवड्यात बिग बॉसच्या घरात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. दरम्यान ‘विकेंड का वार’मध्ये सलमाननं नेहमी प्रमाणे स्पर्धकांशी संवाद साधला आणि त्याच्या चुकांसाठी त्यांना बोलला आणि चांगल्या कामांसाठी त्यांचं कौतुकही केलं. पण आता या एपिसोडमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
रविवारी झालेल्या ‘विकेंड का वार’मध्ये असं काही घडलं की, स्पर्धक आणि सलमान खान या दोघांनाही हसावं की रडावं हे कळेना. विशेषतः सलमानसाठी ही गोष्ट खूप शॉकिंग होती. या एपिसोडमध्ये सलमाननं घरातल्या सदस्यांशी बोलताना मस्तीच्या मूडमध्ये असलेला दिसला. यावेळी त्यांनं हिमांशी खुरानाला विचारलं जर शहनाझ पंजाबची कतरिना कैफ असेल तर मग तू कोण आहेस.
'या' कारणासाठी सलमान खान मध्यरात्री जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी!
सलमानच्या या प्रश्नावर हिमांशी सुरवातील शांत राहीली आणि नंतर म्हणली सर लोकं म्हणतात की मी ऐश्वर्या राय आहे. हिमांशीचं उत्तर ऐकल्यावर सर्वच हैरण झाले. त्यानंतर सलमान म्हणला, वाह! सलमानची प्रतिक्रिया पाहिल्यावर हिंदुस्तानी भाऊला मात्र हसू आवरत नाही आणि त्याला हसताना पाहून सलमानसह बाकी सर्वजणही हसू लागतात.
बोल्ड नोरा फतेहीचं Sexy फोटो सेशन; चाहते म्हणाले Hotty...!
हिमांशीनं स्वतःला ऐश्वर्या राय म्हटल्यावर शहनाझ म्हणाली ‘लगती है-लगती है’. यावर सलमान म्हणतो 'इनको लगती हैं तो आपको चुभती है' हा संवाद इथेच संपत नाही तर सलमान पुढे सुद्धा या पंजाबच्या ऐश्वर्या आणि कतरिनाचं कौतुक करताना दिसला. तो पुढे म्हणाला, फक्त चेहरा मिळता जुळता असून चालत नाही. तुम्हाला फॅट सुद्धा कमी करावं लागेल. जसं कतरिना आणि ऐश्वर्यानं स्वतःला फिट ठेवलं आहे.
KBC ला मिळणार नवा करोडपती? 1 कोटींच्या प्रश्नासाठी खेळणार जेल अधिक्षक
=======================================================================
SPECIAL REPORT: सत्ता स्थापनेवरुन नेटिझन्सनी शिवसेनेला केलं ट्रोल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस