सलमान अर्धवट सोडणार Bigg Boss 13, भाईजानला अचानक झालं तरी काय

सलमान अर्धवट सोडणार Bigg Boss 13, भाईजानला अचानक झालं तरी काय

Bigg boss 13 च्या प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांमधील ड्रामा वाढताना दिसत आहे. त्यामुळे शोला चांगला टीआरपी मिळत आहे. पण तरीही सलमान खान हा शो सोडण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : टीव्हीवरील लोकप्रिय रिअलिटी शो बिग बॉस 13 मागच्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांमधील ड्रामा वाढताना दिसत आहे. ज्यामुळे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होत आहे. सध्या या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेला उत्साह पाहता शोच्या मेकर्सनी फिनाले काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस 13चा सीझन फिनाले 12 जानेवारीला होणार होता. मात्र आता हा 16 फेब्रुवारीला या शोचा फिनाले एपिसोड प्रसारित केला जाणार आहे.

या शोबद्दल एक वृत्त असंही आहे की, शोचा होस्ट सलमान खाननं त्याच्या आगामी सिनेमासाठी शूटिंग डेट आधीच बुक केल्या होत्या त्यामुळे शोचे दिवस वाढवल्यानं आता बिग बॉसच्या मेकर्ससाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात. सिनेमाच्या शूटसाठी सलमान हा शो सोडण्याची शक्यता आहे. पण जर असं झालं तर सलमानची मैत्रीण फराह खान बिग बॉस 13 होस्ट करताना दिसू शकते.

ड्रग्जसाठी अस्वस्थ व्हायचा अभिनेता, दोनदा समुपदेशन केंद्रात करावं लागलं भरती

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार प्रेक्षक बिग बॉसचा 13 वा सीझन खूप एन्जॉय करत आहेत. मागच्या काही दिवसांपासून स्पर्धकांमध्ये सतत भांडण आणि वाद होत आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांना हा शो आता आवडू लागला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून मेकर्स सलमान खान विनंती करत आहेत की त्यानं या शोसाठी आणखी काही दिवस द्यावेत. पण सलमाननं त्याचा आगामी सिनेमा ‘राधे’साठी अगोदरच डेट बुक केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी हा शो सोडणं सर्वात सोपा पर्याय आहे. कारण त्याचा सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. त्यामुळे त्याला या शोसाठी वेळ देणं शक्य नाही. त्यामुळे आता त्याची जागा फराह खान घेण्याची दाट शक्यता आहे.

'मजा डबल करने आ रही हूँ', सनी लिओनीने शेअर केला VIDEO

बिग बॉस शोला एक्सटेन्शन मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या शोचा 8 वा सीझन सुद्धा अशाचप्रकारे वाढवण्यात आला होता आणि त्यावेळीही डेट बुक असल्यानं सलमानला हा शो सोडावा लागला होता. त्यानंतर सलमानची जागा घेत फराहनं शोची होस्टिंग केली होती.

Tanhaji सिनेमाच्या अभिनेत्रीचे बिकिनीतील BOLD PHOTO सोशल मीडियावर VIRAL

Published by: Megha Jethe
First published: November 28, 2019, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading