मुंबई, 08 डिसेंबर : बिग बॉस 13 च्या 10 व्या आठवड्यात होस्ट सलमान खान घरातील सदस्यावर प्रचंड नाराज झालेला दिसला. ‘विकेंड का वार’च्या सुरुवातीलाच सलमाननं तो खूप दुःखी असल्याचं सांगितलं होतं आणि तेही बाकी कोणत्या कारणानं नाही तर घरातील सदस्याच्या वर्तनामुळे असल्याचंही त्यानं सांगितलं. त्यानं रश्मी देसाईपासून बोलायला सुरुवात केली आणि पुढे हे बोलणं सिद्धार्थ शुक्लावर येऊन थांबलं. यावेळी सिद्धार्थ शुक्लाचा राग हा मुद्दा सर्वांनी लावून धरला आणि त्यावरुन सलमान खान चिडला.
सलमान खाननं शोच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की कोणीही रागावू नका एकमेकांशी भांडू नका. मात्र त्याचं बोलणं कोणीही ऐकताना दिसलं नाही. यावेळी सलमान सर्वांचा समाचार घेतला. तो म्हणाला, हे सर्व ते लोक आहेत जे आपल्या आई-वडील आणि गुरुजनांचा मान ठेवत नाहीत. ते माझं काय ऐकणार आहेत. सलमानचं बोलणं सापल्यावर विशाल आदित्य सिंहनं सलमानकडे सिद्धार्थ शुक्लाची तक्रार केली. तो म्हणाला, सिद्धार्थची सर्वांशी बोलण्याची पद्धत चुकीची आहे.
राणी मुखर्जीला पाहिल्यावर सलमान खानला आठवते ‘ही’ भाजी!
विशाल सिंहचं बोलणं ऐकल्यावर सलमाननं सिद्धार्थबद्दल बोलायला सुरुवात केली. सलमान म्हणला, ‘मी अनेकदा सिद्धार्थला वेगवेगळ्या प्रकारे, प्रेमाने, विनोदाने समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकत नाही आणि समजतही नाही. त्यामुळे मी आता त्याच्याशी अजिबात बोलणार नाही.’ खासकरुन सलमानला सिद्धार्थच्या रागवण्याच्या सवयीवर सलमानला भाष्य करायचं नाही असंही त्यानं स्पष्ट केलं.
प्रियांका चोप्राच्या पतीवर ‘ही’ अभिनेत्री फिदा, व्यक्त केली डेट करण्याची इच्छा
यानंतर रश्मी, विशाल आणि भाऊ सर्वांनी मिळून सिद्धार्थच्या बोलण्याच्या पद्धतीवरून त्याच्यावर आरोप केला. यावर सलमान म्हणाला, सिद्धार्थ तू त्यांच्यासोबत बोलतोस तसं माझ्यासोबत कधी बोलू नकोस नाही तर खरंच हे तुला खूप भारी पडेल.
याशिवाय सलमान खाननं घरातील इतर सदस्यांना विचारलं, जर सिद्धार्थची बोलण्याची पद्धत ठिक नाही, तुम्हाला खटकते तर तुम्ही त्याच्याशी बोलायलाच का जाता. त्याच्याशी बोलायचच बंद करा ना. त्यावर सर्वांनी, आम्ही त्याच्याशी बोलायला जात नाही तर तोच घरातील सर्व सदस्यांना चिडवत राहतो असं सांगितलं.
बॉलिवूड गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्री आहेत सैनिकांच्या लेकी!