मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 13 सिद्धार्थ शुक्लाच्या नावावर, मिळवलं एवढ्या लाखांचं रोख बक्षीस

Bigg Boss 13 सिद्धार्थ शुक्लाच्या नावावर, मिळवलं एवढ्या लाखांचं रोख बक्षीस

सिद्धार्थ शुल्का ठरला Bigg Boss 13 पर्वाचा मानकरी

सिद्धार्थ शुल्का ठरला Bigg Boss 13 पर्वाचा मानकरी

सिद्धार्थ शुल्का ठरला Bigg Boss 13 पर्वाचा मानकरी

    मुंबई, 16 फेब्रुवारी: बिग बॉसच्या 13व्या सीझनचा विजेता अखेर मिळाला आहे. या सीझनच्या विजेत्या बद्दल प्रेक्षकांच्या मनात बरीच उत्सुकता होती. सिद्धार्थ शुल्का 13 व्या सिझनचा विजेता झाला आहे. सिद्धार्थने सन्मान चिन्हासोबत दमदार रक्कमही जिंकली आहे. या ट्रॉफीसाठी सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज हे दोघेही प्रबळ दावेदार मानले जात होते. अंतिम टप्प्यात सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज यांच्यात स्पर्धा रंगली होती. बिग बॉस-13 पर्वात अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने जिंकलं आहे. सिद्धार्थ या पर्वात अनेक कारणांनी सर्वाधिक चर्चेत राहिला. मात्र, त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनातही त्याने स्थान मिळवलं. बिग बॉस फिनालेच्या सेटवर दिग्दर्शक रोहित शेट्टीची विशेष उपस्थिती होती. या शोची चर्चा आणि प्रेक्षकांमधील उत्साह पाहून 4 आठवडे हा शो वाढवण्यात आला होता. त्यानंतर सलमान खान या शोमध्ये होस्ट करणार नाहीत अशाही काही चर्चा समोर आल्या होत्या. मात्र सलमान खानने हा शो सोडणार नसल्याचं म्हणत या चर्चांनाही पूर्णविराम दिला. बिग बॉसच्या घरात पैशांनी भरलेली बॅग ठेवण्यात आली होती. ज्यांना असं वाटतं आपण जिंकू शकत नाही अशांनी या शोमधून एक्झिट घेतल्यास त्यांना 10 लाख रुपये मिळतील अशी ऑफर बिग बॉसकडून देण्यात आली होती. ही ऑफर पारसने स्वीकारत घरातून एक्झिट घेतली. पारस आऊट झाल्यानंतर शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांच्यात स्पर्धा रंगली. तर यांच्यातून अंतिम टप्प्यात सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज पोहोचले. यावेळी 15 मिनिटांसाठी लाइव्ह व्होटिंग लाइन ओपन करण्यात आली होती. आणि सिद्धार्थ शुल्का आणि आसिम यांना वोट करण्यासाठी प्रेक्षकांना सांगण्यात आलं. त्यावेळी प्रेक्षकांनी सिद्धार्थ शुल्काला भरभरून मतं दिली. अभिनेता सिद्धार्थने बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच 50 लाख रुपयांची रोख जिंकली आहे. चाहत्यांचं प्रेम आणि प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या मतांमुळे अभिनेता सिद्धार्थ शुल्का बिग बॉस 13 पर्वाचा विजेता ठरला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Big boss hind, Salaman khan

    पुढील बातम्या