Bigg Boss 13 : पारस छाब्रावर भडकला सलमान खान, सर्वांसमोर केली पोलखोल

Bigg Boss 13 : पारस छाब्रावर भडकला सलमान खान, सर्वांसमोर केली पोलखोल

पारस छाब्रानं असं केलं तरी काय की, सलमान खानला राग आवरणंही कठीण झालं आणि त्यानं पारसला चांगलचं सुनावलं.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : बिग बॉसच्या घरात सध्या रोलर कोस्टर राइड सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या फॅमिली वीकमध्ये सर्व स्पर्धकांना भेटायला त्यांच्या घरातले सदस्य आले होते. पण आता यानंतर सर्वांनाच विकेंड का वारमध्ये सलमान खानचा सामना करावा लागणार आहे. मागच्या संपूर्ण आठवड्याभरात बिग बॉस हाउसमध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. त्यामुळे सलमान सर्वांना याचा जाब विचारताना दिसणार आहे. विशाल आदित्य सिंह-मधुरिमा तुली यांच्या हाणामारी सोबतच सलमान पारस छाब्रावरही चिडताना दिसणार आहे.

बिग बॉसच्या शनिवारच्या विकेंड का वारचा प्रोमो त्यांच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात सलमान पारस छाब्रावर संतापलेला दिसत आहे. सुरुवातीला सलमान मधुरिमा आणि विशालला त्यांच्या वर्तणुकीचा जाब विचारताना दिसतो. त्यानंतर पारस छाब्राची कानउघाडणी करताना दिसतो.

मलायका आणि मॉडेलमध्ये कॅटफाइट, अरबाज खान आहे कारण?

सलमाननं पारस आणि माहिराच्या नात्यावर भाष्य करत त्याला विचारलं, तुम्ही दोघंही ज्याला मैत्री म्हणत आहात ती गोष्ट लोकांना मात्र वेगळीच दिसत आहे. तू आकांक्षाला हे बोलून आला आहेस की, जर मी थोडाफार अभिनय केला किंवा गेम खेळलो तर वाईट वाटून घेऊ नकोस. याने आधीपासूनच स्वतःच्या बचावाचा पूल बांधून ठेवला आहे. यावर पारस चिडतो आणि म्हणतो, सर प्लिज या क्रिएटिव्सना सांगा की अशा बेकार गोष्टी बोलणं बंद करा.

बाप-लेकीत कोण बेस्ट? 10 वर्षांनंतरच्या Love Aaj Kal वर सैफची ‘ही’ प्रतिक्रिया

पारसच्या या बोलण्यावर सलमान सांगतो की, हे कोणी क्रिएटिव्सचं बोललेलं नाही. मला आकांक्षानं स्वतः कॉल केला होता हे विचारण्यासाठी की नक्की त्या ठिकाणी काय चाललं आहे. यावर गप्प बसण्याऐवजी पारस सलमानला प्रत्युत्तर करतो. माहिरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र पारस गप्प राहिला नाही. तो म्हणाला, माझ्यावर आरोप केले जात आहेत आणि मी गप्प बसू. त्याचं हे बोलणं ऐकल्यावर सलमानला राग अनावर झाला आणि तो म्हणाला, आरोप काय लावला जात आहे... पारस हा टोन माझ्यासाठी वापरायचा नाही. पण पारस यावरही शांत राहिला नाही. तो म्हाणाला हा आरोप आहे आणि हा बेकार आरोप आहे. मला नाही माहित हे कुठून आणि कोण लावत आहे.

पहचान कौन! हातात बॅट घेतलेला हा चिमुरडा आहे बॉलिवूडचा सगळ्यात मोठा स्टार

पारसच्या अशा वागण्यावरुन सलमानचा पारा चढला आणि त्यानं पारसला चांगलचं सुनावलं. पारसकडे बोट दाखवत सलमान म्हणला, तुझा आवाज खाली ठेव. सलमानचा राग पाहून पारस फायनली शांत बसतो. पण तोपर्यंत त्याचं रहस्य सर्वांसमोर आलेलं असतं. त्यामुळे आता सलमान खान किंवा बिग बॉस पारसबाबत पुढे काय निर्णय घेतात याची सर्वांना उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 03:37 PM IST

ताज्या बातम्या