Bigg Boss 13 : पारसची पोलखोल, गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीनं लीक केले पर्सनल चॅट!

Bigg Boss 13 : पारसची पोलखोल, गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीनं लीक केले पर्सनल चॅट!

पारसच्या बिग बॉसच्या घरातील वर्तनामुळे त्याची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी खूप नाराज आहे.

  • Share this:

मुंबई, 08 डिसेंबर : बिग बॉसच्या या 13 व्या सीझनमध्ये सध्या बरेच भांडण-तंटे होताना दिसत आहेत. पण शोमध्ये एक असा स्पर्धक आहे. जो बिग बॉसच्या घरात तर चर्चेत तर आहेच पण घराबाहेरही त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. हा स्पर्धक आहे पारस छाब्रा. सध्या घरात धुमाकूळ घालत असलेल्या पारसची घराबाहेर एक नवं संकट वाट पाहत आहे असं म्हणायला हरकत नाही. पारसच्या बिग बॉसच्या घरातील वर्तनामुळे त्याची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी खूप नाराज आहे. पारसनं घरात तिच्याबद्दल असं काही बोलला आहे ज्यामुळे आकांक्षा दुखावली गेली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं एका मुलाखतीत दुःख व्यक्त केलं होतं आणि त्यानंतर आता या दोघांचे अतिशय खाजगी चॅट सोशल मीडियावर लीक झाले आहेत.

बिग बॉस खबरी नावाच्या एका बिग बॉस फॅन पेजवरुन पारस आणि आकांक्षाचे हे पर्सनल चॅट शेअर शेअर करण्यात आले आहेत. अनेक सोशल मीडिया अकाउंटवर असं म्हटलं जातंय की हे सर्व चॅट स्वतः आकाक्षानं लीक केले आहेत. या चॅटमध्ये पारस त्याच्या गर्लफ्रेंडला समजावताना दिसत आहे की तिनं फार भावुक होऊ नये आणि तो तिच्यासोबत प्रामाणिक राहिल. याशिवाय या दोघांच्या प्रेमळ गप्पा सुद्धा पाहायला मिळत आहेत. या स्क्रिनशॉटमध्ये वर पारसचं नाव दिसत आहे.

Bigg Boss 13 : सलमान खाननं दिली सिद्धार्थ शुक्लाला धमकी, जाणून घ्या कारण

पारस-आकांक्षाचे चॅट लीक झाले असले तरीही तिनं अद्याप स्वतः हे चॅट लीक केलेत किंवा नाही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे हे स्क्रिनशॉट पारस-आकांक्षाचेच आहेत याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आकांक्षानं पारसच्या वागण्यानं ती दुखावली गेल्याचं म्हटलं होतं. तसेच तो आल्यावर त्याच्याशी याविषयी बोलणार असल्याचंही तिनं सांगितलं होतं. पारसनं याबाबत तिची माफी मागावी अशी तिची इच्छा आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात दुसऱ्यांदा वाइल्ड कार्ड एंट्री घेऊन पोहोचलेल्या अरहान खाननं पारसला त्याची गर्लफ्रेंड त्याला खूप सपोर्ट करत असल्याचं सांगितलं होतं. यावर पारस म्हणाला, मी तिला असं करण्यास अजिबात सांगितलेलं नाही. त्यानंतर जेव्हा अरहान त्याला आकांक्षाच्या नावाच्या टॅटूबद्दल विचारतो. तेव्हा पारस सांगतो की त्याला हा टॅटू जबरदस्तीनं काढावा लागला होता. कारण आकांक्षानं त्याला जबरदस्ती केली होती. पण यावर आकांक्षाचं म्हणणं आहे की तिनं असं कधीच केलं नव्हतं. पारस खोटं बोलत आहे.

वयाच्या 60व्या वर्षी अभिनेत्रीनं घातला शॉर्ट ड्रेस, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

फिटनेससाठी वर्कआऊट, डाएटबरोबर टायगर 'या' गोष्टीची घेतो काळजी

Published by: Megha Jethe
First published: December 8, 2019, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading