Bigg Boss 13: 'मोठ्या ओठांची पाल' म्हटल्याने भडकली माहिरा शर्मा

Bigg Boss 13: 'मोठ्या ओठांची पाल' म्हटल्याने भडकली माहिरा शर्मा

माहिरा ही पारसला भाऊला तोंड बंद करण्यासाठी सांगते. त्यावेळी पारस तिची समजूत काढून तिला शांत करतो.

  • Share this:

मुंबई 15 नोव्हेंबर : बिग बॉसच्या (Bigg Boss 13) घरात रोज काहीतरी ड्रामा हा ठरलेलाच असतो. बिग बॉसच्या घरात जेव्हापासून वाइल्‍ड कार्डच्या माध्यमातून स्पर्धक आले तेव्हापासून नवं नवी भांडणं ही ठरलेलीच आहेत. त्यामुळे या शोमध्ये अधिकच रंजकता आलीय. त्याला प्रेक्षकांचीही जोरदार पसंती मिळतेय. त्यामुळे आता कुठली नवी भांडणं येताहेत याचीच उत्सुकता सगळ्यांना आहे. बिग बॉच्या घरातलं नवं भांडण हे भाऊ आणि महिरामधलं आहे. गुरूवारी रात्री लक्झरी बजेट टास्क सुरू झाला. त्याच बरोबर, आरोप-प्रत्यारोप, भांडणंही सुरूच आहेत. शुक्रवारीही हे टास्क पूर्ण करण्यासाठी सगळेच प्रयत्न करणार आहेत. या शोचा जो नवा प्रोमो आलाय त्यात पारस छाबड़ा (Paras Chhabra) आणि माहिरा शर्मा (Mahira Sharma) हे जेलमध्ये दाखविण्यात आले आहेत त्यामुळे या भागाविषयी सगळ्यांमध्येच उत्सुकता निर्माण झालीय.

रिलीज होताच रानू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या नव्या 'रिमिक्स'ने केली धम्माल!

माहिरा जेलमध्ये असताना हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास हा माहिराची थट्टा करतो. ही थट्टा सुरू असतानाच तो तिला 'मोठ्या ओठां'ची पाल असं चिडवतो. भाऊच्या या वाक्यावर इतर सदस्यही हसल्याने माहिरा भडकली. त्यावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली. सगळ्यांसमोर तु माझी बदनामी केली असा आरोप माहिराने केला. पारस छाबडा हा यावेळी माहिरासोबत जेलमध्ये बंद आहे.

त्यामुळे माहिरा ही पारसला भाऊला तोंड बंद करण्यासाठी सांगते. त्यावेळी पारस तिची समजूत काढून तिला शांत करतो. भाऊ हा मस्करी करतोय त्याकडे फारसं लक्ष देऊ नको अशी समजुतही तो माहिराची काढतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading