मुंबई, 25 जानेवारी : टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉसचा 13 वा सीझन सध्या बराच चर्चेत आहे. मागच्या काही काळापासून या शोमध्ये बरेच वाद आणि भांडणं पाहायाला मिळत आहेत. एवढंच नाही तर या गोष्टी आता एकमेकांशी मारामारी करेपर्यंत पोहोचल्या आहेत. सध्या या शोचा नवा प्रोमो सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. यात सकाळी सकाळी बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया या सदस्यांना भेटायला पोहोचला असूनं त्यानं यावेळी सर्वांसमोर रश्मि देसाई पोलखोल केली आहे. ज्यामुळे आता घरात नवा वाद होण्याची शक्यता आहे.
हिमेश रेशमियानं बिग बॉसच्या घरात रश्मि देसाईचं असं गुपित उलगडलं ज्यामुळे घरातील इतर सदस्यांनाही धक्का बसला आहे. हिमेश सुरुवातीला आशिकी हे त्याचं गाणं गाऊन सर्वांना उठवतो. त्यानंतर तो माहिराकडे चहा मागतो. माहिरा चहा बनवायला जाते पण तिला चहा पावडर सापडत नाही. त्यावर हिमेश रश्मिकडे वळतो आणि तिला सांगतो रश्मि तु लपवलेली चहा पावडर आणून देशील का मला चहा प्यायचा आहे.
नसीरुद्दीन शाहांच्या मुलगीच्या विरोधात FIR दाखल, समोर आलं धक्कादायक कारण
हिमेशनं असं अचानक रश्मिची पोलखोल केल्यानं घरातील सर्वच सदस्य चकीत होतात. कारण तिनं चहा पावडर लपवल्याचं कोणालाही माहित नसतं. माहिरा विचारते, चहा पावडर लपवली गेली होती? तर दुसरीकडे सिद्धार्थ शुक्ला रश्मिला चोर-चोर म्हणू लागतो. ज्यावरुन सिद्धार्थ आणि आसिम या दोघांमध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटतं.
साराला या सिनेमात संधी द्यायचीच नव्हती, सैफ अली खानचा धक्कादायक खुलासा
हिमेश रेशमियानं बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यानं आता आणखी कोणते नवे वाद होणार आणि कोण एकमेकांना भिडणार हे पाहाणं रंजक ठरणार आहे. याशिवाय आज ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खान घरातील सर्वच सदस्यांची जोरदार कानउघडणी करताना दिसणार आहे.
सेजल शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट, मित्रानं केला मोठा गौप्यस्फोट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Himesh reshmiya