Bigg Boss 13 : ‘सिद्धार्थ शुक्लानं अनेकदा मला मारहाण केली’, शिल्पा शिंदेचा खळबळजनक आरोप

Bigg Boss 13 : ‘सिद्धार्थ शुक्लानं अनेकदा मला मारहाण केली’, शिल्पा शिंदेचा खळबळजनक आरोप

बिग बॉच्या 11 व्या सीझनची विजेती शिल्पा शिंदेन काही खळबळजक आरोप केल्यानं सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : बिग बॉस 13 च्या फिनालेला अवघे काही तास उरले आहेत. या संपूर्ण सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहीलेला स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला या सीझनच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र त्याच्याबाबत बिग बॉच्या 11 व्या सीझनची विजेती शिल्पा शिंदेन काही खळबळजक आरोप केल्यानं सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. ज्याचा परिणाम सिद्धार्थच्या वोटिंगवर पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शोमधील अनेक गणित सुद्धा बदलू शकतात.

काही दिवसांपूर्वी शिल्पा आणि सिद्धार्थच्या संभषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती ज्यामध्ये सिद्धार्थ तिला तुला माझ्यासोबत रिलेशिपमध्ये राहायचं आहे की नाही असं विचारत असल्याचं ऐकू येत होतं मात्र शिल्पाचा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. या संदर्भातच शिल्पानं एक वेबसाइटला मुलाखत दिली. यावेळी तिनं सिद्धार्थ शुक्लासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य करत त्याच्यावर काही गंभीर आरोपही केले आहेत.

मलायकाचा Black & White मधील हॉट अंदाज, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

 

View this post on Instagram

 

#shilpashinde #like4like #saree #cute #pretty #bb11 #beauty #look

A post shared by Shilpa Shinde (@shilpashindeb) on

शिल्पा शिंदे म्हणाली, हो मी सिद्धार्थसोबत रिलेशिनशिपमध्ये होते. पण असं असताना तो अनेकदा लहान लहान गोष्टींवरुन नाराज होत असे. अनेकदा रागाच्या भरात त्यानं शिवीगाळ करत त्यानं मला मारहाण सुद्धा केली आहे. या नात्यात तो खूपच पझेसिव्ह होता आणि त्यामुळे तो मला नेहमीच मारहाण करायचा.

Video Viral झाल्यानंतर नेहाशी लग्न करण्याबाबत आदित्य नारायणचा धक्कादायक खुलासा

शिल्पा पुढे म्हणाली, ‘तो या सीझनचा विजेता व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. त्याच्यासारख्या व्यक्तीनं हा शो जिंकणं यापेक्षा जास्त वाईट काही असूच शकत नाही.’ कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी शिल्पा याआधीच आसिम रियाजला सपोर्ट करताना दिसली आहे. तिच्यामते आसिम या ट्रॉफीचा खरा हकदार आहे. कारण त्यानं कोणत्याही स्टारडमशिवाय या शोमधील सर्व प्रवास केला आहे.

माहिरा शर्मा या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता घरात फक्त शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह एवढेच सदस्य उरले आहेत. फिनालेच्या आधी स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्स दाखवण्यात येणार आहेत. काल प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये याची एक झलक दाखवण्यात आली होती.

'अभिनेत्री होण्यासाठी कोणासोबत अय्याशी केली नाही', तनुश्री दत्ता पुन्हा भडकली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2020 05:25 PM IST

ताज्या बातम्या