बिग बॉस 13 च्या स्पर्धकांची यादी झाली लिक, या कलाकारांच्या नावांची चर्चा

बिग बॉस 13 च्या स्पर्धकांची यादी झाली लिक, या कलाकारांच्या नावांची चर्चा

यंदा या शोमध्ये कोण सहभागी होणार याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे : कलर्स टीव्ही लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'चा 13 सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनची तयारीही सुरू झाली आहे. यंदा सलमान खान त्याच्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असला तरीही तो बिग बॉसचा शो सुद्धा होस्ट करणार आहे आणि यावर्षी या सीझनची कॉन्सेप्ट मागच्या वर्षीपेक्षाही खास आणि वेगळी असणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून यावेळी या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. अशातच आता बिग बॉस 13च्या स्पर्धकांच्या नावांची यादी लिक झाली आहे. ज्यात टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांची नावं समोर आली आहेत. मात्र ही नावं अद्याप फायनल झालेली नाहीत.

मीडिया रिपोर्टनुसार यंदा बिग बॉसच्या घरात फक्त टीव्ही कलाकार सहभागी होणार आहेत. लिक झालेल्या या अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. यावेळी या शोमध्ये कोणीही आउट साइडर सहभागी होणार नाही कारण यामुळे या शोच्या टीआरपीवर परिणाम होत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे यंदा या शोमध्ये कोण सहभागी होणार याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे या लिक झालेल्या यादीमुळे बिग बॉसच्या स्पर्धकांविषयी अंदाज लावला जाऊ शकतो.


मीडिया रिपोर्टनुसार टीव्ही अभिनेत्री माही विज, जय भानुशाली आणि विवेक दहिया यांना या शोसाठी विचारणा करण्यात आली आहे. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा पती विवेक दहिया त्याच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असतो. तर टीव्हीवरील लोकप्रिय जोडी माही विज आणि जय भानुशाली शोचा टीआरपी वाढवण्यास मदत करू शकतात. पण माही आणि जय लवकरच आई-बाबा होणार असल्यानं ते या शोसाठी नकारही देऊ शकतात.


याशिवाय 'बेहद' फेम अभिनेत्री अनेरी वजानीच्या नावाचाही या लिस्टमध्ये समावेश आहे. काही दिवासांपूर्वी बिकिनी फोटो व्हायरल झाल्यानं अनेरी खूप चर्चेत आली होती. आशियाची सर्वात मादक महिलेचा पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री निया शर्मा सुद्धा या शोमध्ये सहभागी होण्याच्या शक्यता आहेत. तसेच या लिस्टमधून अभिनेत्री अंचित कौर, 'कसौटी जिंदगी की' फेम अनुराग म्हणजे, सीजेन खान हे सुद्धा यंदा या शोमध्ये दिसतील असं म्हटलं जातंय.


या व्यतिरिक्त अभिनेत्री एवलिन शर्मा, कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया, अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हे सुद्धा यंदा बिग बॉसच्या घरात दाखल होऊ शकतात. मात्र यापैकी कोणत्याही कलाकाराकडून याबाबतची कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.


टायगरला या खास नावानं हाक मारते कृती सेनन, काय असेल गर्लफ्रेंड दिशा पाटनीची प्रतिक्रिया?


India's Most Wanted च्या स्क्रिनिंगला अर्जुनच्या 'या' सावत्र बहिणीबरोबर वाढलं मलायकाचं बाँडिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 04:04 PM IST

ताज्या बातम्या