मुंबई, 25 जानेवारी : बिग बॉसचा हा 13 वा सीझन बराच वादग्रस्त ठरला. यंदाच्या सीझनमध्ये बरेच वाद-विवाद आणि भांडणं पाहायला मिळाली. पण यंदाच्या सीझनमध्य सर्वाधिक चर्चेत राहिले ते असिम रियाज आणि सिद्धार्थ शुक्ला. या शोमध्ये येण्याआधी आसिमला फारसं कोणी ओळखत नव्हतं मात्र आता त्याचे लाखो-करोडो चाहते आहेत. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे ती म्हणजे, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आसिम सनी लिओनीसोबत एका सिनेमात काम करताना दिसणार आहे.
काही मीडिया रिपोर्टनी दिलेल्य माहितीनुसार आसिम सध्या एक मोठ्या सिनेमाच्या शूटिंगची वाट पाहत आहे. ज्यात तो सनी लिओनीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. फिल्मीबीटनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट आसिमला लॉन्च करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याच्या आधीच आसिम हा सिनेमा साइन करण्याची शक्यता आहे. पण या प्रोजेक्टची कोणतीही ऑफिशिअल अनाउन्समेंट अद्याप झालेली नाही किंवा महेश भट किंवा सनी लिओनी यापैकी कोणीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
...म्हणून सेजल शर्माने उचलले टोकाचे पाऊल, ग्लॅमर्स दूनियेचा आणखी एक बळी!
याआधी सनी लिओनीला सुद्धा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावरच महेश भट यांच्याकडून सिनेमा ऑफर झाला होता. सनी महेश भट यांच्या ‘जिस्म 2’ मध्ये दिसली होती. याशिवाय सनी लिओनी आणि आसिम रियाज काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात भेटले होते. यावेळी ती तिचा सिनेमा ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या प्रमोशनसाठी आली होती.
हॉलिवूडनंतर इथेही आलं सोशल मीडिया फोटो चॅलेंज; आयुष्मान, जॅकलीननंतर सई सामील
बिग बॉस शोबद्दल बोलायचं तर या सीझनचा फिनाले एपिसोड लवकरच प्रसारित होणार आहे. दरम्यान फिनालेच्या अगोदरच घरातील वाद विकोपाला गेलेले दिसत आहे. घरातील बहुचर्चित जोडी सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल यांच्यातील मैत्रीत फुट पडली आहे. तसेच आसिम सिद्धार्थमधील वाद एवढे विकोपाला गेले आहेत की त्यांच्यात रोजच जोरदार भांडण होत आहे.
'दिल तो हॅप्पी है' फेम अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Sunny Leone