Bigg Boss 13 : आसिमनं आरती सिंहला म्हटलं फिक्स डिपॉझिट, सिद्धार्थ शुक्लाला संताप अनावर

Bigg Boss 13 : आसिमनं आरती सिंहला म्हटलं फिक्स डिपॉझिट, सिद्धार्थ शुक्लाला संताप अनावर

आसिम रियाज आरती सिंहचा उल्लेख सिद्धार्थ शुक्लाची फिक्स डिपॉझिट असा केला.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी : टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉसचा 13 वा सीझन सध्या बराच चर्चेत आहे. मागच्या काही काळापासून या शोमध्ये बरेच वाद आणि भांडणं पाहायाला मिळत आहेत. एवढंच नाही तर या गोष्टी आता एकमेकांशी मारामारी करेपर्यंत पोहोचल्या आहेत. सध्या या शोचा नवा प्रोमो सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. ज्यात सर्वाधिक चर्चेत असणारा स्पर्धक आसिम रियाज आरती सिंहला सिद्धार्थ शुक्लाची फिक्स डिपॉझिट असल्याचं बोलताना दिसत आहे.

बिग बॉसचा हा नवा प्रोमो व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावरुन आज रात्री प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये आसिम आणि सिद्धार्थमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूड डेब्यूआधीच चर्चेत आहे सैफची ऑनस्क्रीन मुलगी, पाहा तिचे HOT PHOTOS

बिग बॉसच्या ऑफिशिअल पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये घरातील सदस्या एकमेकांशी बोलत असताना आसिम रियाज आरती सिंहचा उल्लेख सिद्धार्थ शुक्लाची फिक्स डिपॉझिट असा केला. ज्यावरुन घारात नवा वाद सुरू झाल्याचं दिसत आहे. सिद्धार्थ आसिमला विचारतो की माझं फिक्स डिपॉझिट असं तू कोणाला म्हटलंस. जर तू आरतीला बोलत आहेस तर हा एक घाणेरडा शब्द आहे आणि ज्याप्रकारे या ठिकाणी हा शब्द वापरण्यात आला आहे त्यावरुन तर हा शब्द चांगल्या हेतून वापरलेला नाही.

सिद्धार्थ आणि आसिमच्या वादानंतर घरातील काही सदस्य आरतीला फक्स डिपॉझिट शब्दाचा अर्थ समजावताना दिसतात. ज्यामुळे आरती सिंह आसिम रियाज आणि रश्मी देसाई यांच्यावर भडकते. त्यानंतर आरतीला कन्फेशन रुममध्ये बोलवलं जातं आणि रडू लागते आणि बिग बॉसना सांगते की तिला या सर्व गोष्टींमुळे त्रास होत आहे.

रानू मंडलच्या Viral Video वर हिमेश रेशमियानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

बिग बॉसच्या घारात घडलेल्या या घटनेचे पडसाद आता सोशल मीडियावरही उमटताना दिसत आहेत. सोशल मीडियावरुन आसिम रियाजवर टीका केली जात आहे. एका मुलीला असं बोलताना आसिमला लाज वाटायल हवी असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. तर काहींनी आसिमला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणीही केलेली आहे.

सुहानाच्या वयाच्या मुलीनं शाहरुखकडे मागितला सल्ला, किंग खाननं दिला 'हा' रिप्लाय

First published: January 24, 2020, 4:15 PM IST

ताज्या बातम्या