Bigg Boss 13: ‘13 वर्षांची असताना झाला होता बलात्काराचा प्रयत्न’, बिग बॉस फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

Bigg Boss 13: ‘13 वर्षांची असताना झाला होता बलात्काराचा प्रयत्न’, बिग बॉस फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

बिग बॉस स्पर्धेक आणि अभिनेता गोविंदा यांची भाची असलेल्या अभिनेत्रीवर झाला होता बलात्काराचा प्रयत्न.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : बिग बॉसचा 13वा हंगाम हा सगळ्यात मोठा हंगाम मानला जात आहे. यात हंगामात दरदिवशी वेगवेगळ्या विषयांवर भांडण होत असतात. सलमान खान मुख्य होस्ट असलेला हा शो आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. दरम्यान या हंगामाच्या आज प्रदर्शित होणाऱ्या भागामध्ये बिग बॉस फेम आरती सिंगनं एक खळबळजनक खुलासा केला आहे. आरतीनं आपल्यावर 13 वर्षांची असताना बलात्काराचा प्रयत्न झाला होता, असे सांगत सर्व स्पर्धकांना हादरून सोडले.

आरती सिंग आपल्यावर झालेल्या या अतिप्रसंगाची कहानी सांगतानाचा एक प्रोमो बिग बॉसनं रिलीज केला आहे. यात सर्व स्पर्धेत छपाक सिनेमातील प्रमुख अभिनेत्री दीपिका दीपिका पादुकोण आणि अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.

वाचा-दीपिकाच्या छपाकनं दुसऱ्या दिवशीही दाखवला दम, केली इतक्या कोटींची कमाई

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता विक्रांत मेस्सी आणि लक्ष्मी अग्रवाल 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस (बिग बॉस 13) च्या घरी पोहोचल्या. यासाठी चॅनेलने एक प्रीकॅप व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये घरातील स्पर्धेत त्यांच्याबरोबर आपल्यासोबत घडलेल्या काही वाईट क्षणांची आठवण करुन भावुक होताना दिसत आहेत.

वाचा-कुशल पंजाबीच्या जवळच्या मित्रानं केला खुलासा, आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

वाचा-बॉलिवूडची पहिली स्टंट वुमन, 'शोले' मध्ये हेमा मालिनींसाठी केला होता हा स्टंट

बिग बॉस 13च्या आजच्या भागात अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची (Krushna Abhishek) बहीण आरती सिंहसोबतच (Aarti Singh) विशाल, मधुरिमा आणि रश्मी देसाई यांनी आपल्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगांना उजाळा दिला. या व्हिडीओमध्ये कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंगने एक मोठा खुलासा केला. तिने सांगितले की लहान असताना तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला गेला. आरतीनं यावेळी, 'जेव्हा मी 13 वर्षांचा होतो, तेव्हा मला घरात बंद करून माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला, असे सांगितले. आजही या अनुभवाची आठवण आल्यानंतर आरतीला अश्रु अनावर होतात, असेही ती म्हणाली.

वाचा-दीपिकाच्या अडचणीत वाढ, ‘हा’ आदेश न पाळल्यास छपाक दिसणार नाही चित्रपटगृहात

यानंतर विशाल आदित्य सिंगनेही आपली कहाणी सांगितली आणि मधुरिमा तुलीनं लैंगिक छळ झाल्याचा खुलासा करत त्या कटु आठवणींमुळे ती ढसाढसा रडू लागली. या सगळ्या कथा ऐकून स्पर्धकांसह दीपिका आणि विक्रांतही भावूक झाले होते.

Published by: Priyanka Gawde
First published: January 12, 2020, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading