बिग बॉसच्या १२ व्या पर्वात वादग्रस्त खेळाडू श्रीशांत स्वतःचं नशीब आजमावयाला आला आहे. बिग बॉसच्या घरात पहिले दोन दिवस श्रीशांत फार शांत होता. पण आता मात्र तो लोकांच्या नजरेत यायला लागला आहे. काही दिवसांपूर्वी सबा आणि सोमी खान या बहिणींसोबत वाद झाला होता. हा वाद शमतो न शमतो तोच श्रीशांत नवीन वादात अडकला आहे. घरात श्रीशांत आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलतो. पण पहिल्यांदा श्रीशांतने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल एक अशी घटना सांगितली जी ऐकून इतर स्पर्धक भावूक झाले.
श्रीशांत बाथरूम एरियामध्ये अनुप जलोटा आणि कृती वर्माशी बोलत होता. तेव्हा अनुप कृतीला म्हणाले की, ‘तू जशी इतर स्पर्धकांशी बोलते तशी रोशमी बोलत नाही. तिला सांग की सर्वांशी बोलायला.’ तेव्हा श्रीशांत म्हणाला की, ‘सध्या रोशमी हा विचार करत असेल की तिला घरातल्यांनी नॉमिनेट का केलं. मी गेल्या पाच वर्षांपासून या गोष्टीचा विचार करतोय की मला मैदानात जाण्याची परवानगी का नाही. माझा मुलगा मोठा झाला आणि तो क्रिकेट खेळायला लागला तर मी त्याच्या शाळेतल्या मैदानातही जाऊ शकत नाही. मी जगभरातल्या कोणत्याच मैदानात जाऊ शकत नाही. असे नियम बनवले गेले आहेत.’
यापुढे श्रीशांत म्हणाला की, ‘हा सगळा एक अनुभव आहे. मी क्रिकेटला फार मिस करतो. म्हणून मी काल प्लॅस्टिकने बॉल बनवला. मी भावूक याकारणासाठीही झालो की मला माहितीये की मी क्रिकेटला किती मिस करतो.’ २०१३ मध्ये श्रीशांतवर स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात आजीवन बंदी घालण्यात आली. या प्रकरणात त्याला तुरूंगवासही भोगावा लागला.
मॅच फिक्सिंग प्रकरणातनंतर श्रीशांत डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने जगण्याची इच्छाच सोडून दिली होती. त्याला लग्न करु नये असेच वाटत होते. एका मुलाखतीत श्रीशांतने सांगितले की, आत्महत्या करण्याचा विचारही त्याच्या मनात येऊन गेला. याबद्दल बोलताना श्रीशांत म्हणाला की, ‘dआत्महत्येचा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा मी आई- वडिलांचा विचार केला. त्यांना अजून तीन मुलं आहेत. त्यामुळे जर मी गेलो तर ते माझ्याशिवाय राहू शकतात. तेव्हा भुवनेश्वरीच्या वडिलांनी मला सांगितले की, भुवनेश्वरीला अजूनही तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तेव्हा मनात विचार केला की, भुवनेश्वरीशी लग्न केल्याशिवाय मी हे जग सोडू शकत नाही.’
VIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.