Video- Bigg boss 12 मध्ये श्रीशांतने मॅच फिक्सिंगचा केला खुलासा, रडत रडत सांगितला किस्सा

Video- Bigg boss 12 मध्ये श्रीशांतने मॅच फिक्सिंगचा केला खुलासा, रडत रडत सांगितला किस्सा

श्रीशांत म्हणाला की, त्याच्यावर १० लाख रुपये घेतल्याबद्दल मॅच फिक्सिंगचा आरोप लगावण्यात आला.

  • Share this:

लोणावळा, २७ नोव्हेंबर २०१८- सध्या बिग बॉस १२ मध्ये श्रीशांतवरच साऱ्यांची नजर आहे. माजी क्रिकेटर आणि अभिनेता श्रीशांतने घरातील सर्व सदस्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. दर दिवशी तो असं काही करतो की ज्यामुळे घरातील स्पर्धकांच्या तोंडी त्याचेच नाव असते. गेल्या आठवड्यात श्रीशांतने सुरभी राणाला ब्रेकिंग न्यूज देताना हरभजन सिंगसोबत झालेल्या ‘स्लॅपगेट’ चा किस्सा सांगितला. हरभजन आणि श्रीशांतमध्ये झालेल्या या किश्यांमुळे बिग बॉसमधल्या स्पर्धकांना चांगलेच खाद्य मिळाले. श्रीशांतने या आठवड्यात एका टास्कदरम्यान डान्सने स्पर्धकांना थक्क करून सोडलं होतं. आता श्रीशांतने मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर जबरदस्त खुलासा केला आहे.
 

View this post on Instagram
 

Kal Dekhiye #bb12


A post shared by Bigg Boss 12 💙 (@biggboss_khabri) on


बिग बॉस १२ च्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, श्रीशांत दीपिका आणि रोमिलला त्याच्यावर लगावण्यात आलेल्या मॅच फिक्सिंगबद्दल खुलासा करत आहे. श्रीशांत म्हणाला की, त्याच्यावर १० लाख रुपये घेतल्याबद्दल मॅच फिक्सिंगचा आरोप लगावण्यात आला. आजचा एपिसोड यासंदर्भातलाच असेल. श्रीशांतने अनेकदा त्याच्या क्रिकेट करिअरवर मोठमोठे खुलासे केले आहेत. बिग बॉसमधून तो फक्त प्रेक्षकांना त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलच माहिती देत आहे असं नाही, तर खेळातही तो चातुर्याने पुढे जात आहे.

बिग बॉस १२ मध्ये श्रीशांत पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहिला आहे. श्रीशांतला प्रेक्षकांनी अनेकदा शोमध्ये ढसाढसा रडताना पाहिले आहे. श्रीशांतने बिग बॉसच्या घरातून पळायचाही प्रयत्न केला आहे. मात्र सलमान खानच्या सांगण्यावरून त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर श्रीशांत सिक्रेट रूममध्ये गायक अनुप जलोटा यांच्यासोबत राहिला आहे. यानंतर त्याने आपला संपूर्ण गेम प्लॅन बदलला. आजही बिग बॉसच्या घरातील सर्वात दमदार स्पर्धक म्हणून श्रीशांतचे नाव घेतले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 01:37 PM IST

ताज्या बातम्या