Bigg Boss 12: घरातील सर्वात कमकुवत स्पर्धक ठरले नेहा पेंडसे- अनुप जलोटा

Bigg Boss 12: घरातील सर्वात कमकुवत स्पर्धक ठरले नेहा पेंडसे- अनुप जलोटा

पहिल्याच दिवशी घरातल्यांना वैतागला दीपक ठाकूर

  • Share this:

मुंबई, १८ सप्टेंबर- भारतातील सर्वात वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. नुकताच या रिअलिटी शोचा १२ वा सिझन सुरू झाला. सध्या बिग बॉसच्या घरात १७ स्पर्धक आहेत. यात काही विचित्र जोड्या आहेत. या जोड्यांमध्ये सर्वसामान्य ही आहेत आणि सेलिब्रिटीही आहेत. भजन सम्राट अनुप जलोटा हे या घरातील सर्वात वृद्ध स्पर्धक आहेत. यावेळी दोन गायकही या घरात स्पर्धक म्हणून आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना वादविवादासोबत चांगली गाणीही ऐकायला मिळतील यात काही शंका नाही. एकंदरीत स्पर्धकांच्या नावांवर नजर टाकली तर हे पर्व चांगलंच गाजेल असे म्हणायला हरकत नाही.

लाइव्ह वोटिंगमध्ये नेहा- अनुप ठरले कमकुवत स्पर्धक

बिग बॉसच्या घरात अनुप, जसलीन आणि दीपक यांना घरातल्यांनी निशाण्यावर घेतले. घरात झालेल्या वोटिंगमध्ये नेहा आणि अनूप यांना सर्वात कमकुवत सदस्य मानण्यात आले. बिग बॉसच्या घरातील पहिला टास्क खुद्द हिना खान आणि हितेन तेजवानी घेऊन आले. या टास्कमध्ये अनूप- जसलीन आणि दीपकवर लक्ष्य केलं गेलं. अनूप- जसलीनच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेता करणवीर म्हणाला की, ‘पहिल्यांदा त्यांना एकत्र पाहून मी फार संभ्रमीत झालेलो. ’ तर दीपकला त्याच्या देसी अंदाजात पाहिल्यामुळे अनेकांनी त्याला लक्ष केले.

बिहारचा देसी गायक दीपक ठाकूर पहिल्याच दिवशी घरातल्यांना वैतागला. घरात पोहोचल्यावर इतर स्पर्धकांनी त्याच्यावर कमेंट द्यायला सुरूवात केली. अखेर दीपकने अनुप जलोटा आणि जसलीनसमोर आपलं मन मोकळं केलं. सौरभ पटेल त्याला सातत्याने कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दीपक म्हणाला.

VIDEO: 'अल्याड शंकर धुणे धुतो, पल्याड गौराई न्याल ग'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 11:28 AM IST

ताज्या बातम्या