Bigg Boss 12: टास्कमध्ये जसलीनने दुखावलं अनुप जलोटांचं मन, अखेर केला नात्याचा शेवट

Bigg Boss 12: टास्कमध्ये जसलीनने दुखावलं अनुप जलोटांचं मन, अखेर केला नात्याचा शेवट

आता मी जोडीत खेळणार नाही. मी आता एकटा आहे. मी ही जोडी तोडत आहे

  • Share this:

मुंबई, ०२ ऑक्टोबर २०१८-  बिग बॉस १२ च्या सोमवारच्या एपिसोडमध्ये जसलीन मथारूचे अनुप जलोटांसाठी असलेल्या प्रेमाची अग्नीपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ती सपशेल नापास झाली. बिग बॉसने दिलेल्या एका टास्कमध्ये अनुप यांना नॉमिनेशनमधून वाचवण्यासाठी जसलीनला स्वतःचे केस, मेकअप आणि कपडे यांचा बळी द्यावा लागणार होता. मात्र जसलीनला अनुप यांच्यापेक्षा तिचे कपडे, मेकअप आणि केस महत्त्वाचे वाटले. त्यामुळे दोघंही नॉमिनेट झाले.

जसलीनला तिचे केस खांद्यापर्यंत कापायचे होते. तसेच तिच्याजवळ असलेले सर्व कपडे आणि मेकअप कीट कायमस्वरुपी नष्ट करायचा होते. याउलट जसलीन दीपिकालाच तिच्यासाठी या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या होत्या हे समजावताना दिसली.

सौरभनेही तिला बलिदान देण्याची अनेकदा विनवणी केली. मात्र जसलीनने यासाठी स्पष्ट नकार दिला. जसलीनचे कपडे आणि मेकअपसाठी असलेले प्रेम पाहून जलोटांना अतीव दुःख झालं. तिच्या या प्रकारातूनच त्यांनी जसलीनसोबतचे नाते संपण्याचा निर्णय घेतला.

ते जसलीनला सर्वांसमोर म्हणाले की, ‘अशा टास्कमध्ये तुमच्या प्रेमाची खोली दिसून येते. तुला माझ्यापेक्षा तुझं हे सामान अधिक महत्त्वाचं वाटलं. आता मी जोडीत खेळणार नाही. मी आता एकटा आहे. मी ही जोडी तोडत आहे.’

Video : आर्य चाणक्यांनी दिलेले हे ६ उपदेश ऐकाल तर यशस्वी व्हाल

First published: October 2, 2018, 1:31 PM IST

ताज्या बातम्या