Bigg Boss 12: घरात येताच श्रीशांतने मोडले ३ नियम

Bigg Boss 12: घरात येताच श्रीशांतने मोडले ३ नियम

क्रिकेटमधला वादग्रस्त खेळाडू श्रीशांतने घरात गेल्यावर आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे

  • Share this:

मुंबई, २१ सप्टेंबर- बिग बॉसचं १२ वं पर्व सुरू झाल्यावर पहिल्याच दिवसांपासून वादाला सुरुवात झाली आहे. आधी अनुप जलोटा यांनी त्यांच्याहून ३७ वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत घरात प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर आता क्रिकेटमधला वादग्रस्त खेळाडू श्रीशांतने घरात गेल्यावर आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. अजून एक आठवडाही पूर्ण झालेला नाही आणि श्रीशांतने बिग बॉसच्या घरातले नियम मोडण्यास सुरूवात केलीय.

बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी त्याचं सोमा खानसोबत भांडन झालं. त्यावेळी श्रीशांतने रागात माइक काढला होता. माइक काढणं हे बिग बॉसच्या नियमांच्या विरुद्ध आहे. माइक काढून तो बाहेर जातच होता पण त्याला घरातल्यांनी अडवलं. त्यानंतर त्याचा चक्क घरात मोबाईल वापरत असल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या घरात राहणाऱ्यांना घराबाहेरील लोकांशी काही संबंध ठेवायचा नसतो. हे नियम माहित असतानाही श्रीशांतने मोबाईल वापरला असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या प्रकारानंतर श्रीशांतचा घरातील आणखीन एक वाद समोर आलाय. गुरुवारी प्रसारित झालेल्या भागात श्रीशांत पुन्हा एकदा घरातल्यांशी भांडताना दिसत आहे. यावेळी तो शिवाशीश मिश्रासोबत भांडताना दिसत आहेत. या वादात त्याने चक्क शिवीगळ केलीय. घरात शिविगाळ करण्याला बंदी आहे. तरीही श्रीशांतने शिविगाळ केली. आठवड्याच्या टास्कवरून हा वाद झाला.

Bigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल?

First published: September 21, 2018, 1:01 PM IST

ताज्या बातम्या