Big Boss 12: ३७ वर्ष छोट्या मुलीला डेट करतायेत भजन सम्राट अनुप जलोटा, शोमध्ये केला खुलासा

Big Boss 12: ३७ वर्ष छोट्या मुलीला डेट करतायेत भजन सम्राट अनुप जलोटा, शोमध्ये केला खुलासा

भजन सम्राट अनूप जलोटा यांची याआधी तीन लग्न झाली आहेत

  • Share this:

मुंबई, १७ सप्टेंबर- बिग बॉस १२ या रिअलिटी शोला रविवार १६ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. हा रिअलिटी शो अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतो. सध्या बिग बॉस १२ मध्ये भजन सम्राट अनूप जलोटा आणि त्यांची प्रेयसी जसलीन मथारू यांच्या नात्याबद्दलच चर्चा होताना दिसत आहेत. अनूप यांनी बिग बॉसच्या मंचावरच आपल्या प्रेमाची कबूली दिली.

अनूप आणि जसलीन यांनी बिग बॉसमध्ये ‘विचित्र’ जोडी म्हणून प्रवेश केला आहे. या दोघांना ‘विचित्र’ जोडी म्हटलं जातंय याच मुख्य कारण म्हणजे दोघांच्या वयात ३७ वर्षांचं अंतर आहे. २८ वर्षांची जसलीन आणि ६५ वर्षांचे अनूप जलोटा गेल्या साडे तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या नात्याची कबूली देताना जसलीन म्हणाली की, 'आतापर्यंत आमच्या नात्याबद्दल कोणालाच माहित नव्हते. पण आता आम्ही जगाला आमच्या नात्याबद्दल सांगायला तयार झालो आहोत.'

भजन सम्राट अनूप जलोटा यांची याआधी तीन लग्न झाली आहेत. त्यांची पहिली पत्नी गायिका सोनाली सेठ होती. सोनालीनंतर त्यांनी बीना भाटिया यांच्यासोबत अरेंज मॅरेज केलं. मात्र हे लग्नही फार काळ टिकलं नाही. दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अनूप यांनी तिसरे लग्न माजी पंतप्रधान आय.के. गुजरालची भाची मेधा गुजराल यांच्यासोबत केले. मात्र २०१४ मध्ये मेधा यांचे निधन झाले. पण आता गेल्या तीन वर्षांपासून अनूप जसलीनला डेट करत आहेत.

भाजप खासदाराचे पाय धुऊन कार्यकर्त्यांनी प्यायले पाणी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2018 12:35 PM IST

ताज्या बातम्या