बिग बॉस 11मध्ये मराठमोळा झेंडा; शिल्पा शिंदे विजयी

बिग बॉस 11मध्ये मराठमोळा झेंडा; शिल्पा शिंदे विजयी

प्रतिस्पर्धी हिना खान हिच्यावर मात करत शिल्पानं 'बिग बॉस ११'चं विजेती ठरली आहे. शिल्पा शिंदे, विकास गुप्ता, हिना खान आणि पुनीश शर्मा हे चार जण 'बिग बॉस'च्या अंतिम फेरीत पोहोचले होते.

  • Share this:

15 जानेवारी : 'भाभीजी घर पर है?' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'अंगुरी भाभी' अर्थात मराठमोळ्या शिल्पा शिंदेनं 'बिग बॉस ११' चं विजेतेपद पटकावलं आहे. प्रतिस्पर्धी हिना खान हिच्यावर मात करत शिल्पानं 'बिग बॉस ११'चं विजेती ठरली आहे. शिल्पा शिंदे, विकास गुप्ता, हिना खान आणि पुनीश शर्मा हे चार जण 'बिग बॉस'च्या अंतिम फेरीत पोहोचले होते. परंतु, पुनीश शर्मा सर्वात आधी या स्पर्धेतून बाद झाला. अंतिम फेरीत विकास गुप्ताही बाद झाला.

प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीच्या बिग बॉसचे वादही चांगलेच गाजले. लाईव्ह वोटिंगनंतर शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात काटे की टक्कर सुरू होती. पण कार्यक्रमाचा सुत्रधार सलमान खान यान शिल्पा शिंदेचं नाव जाहिर करताच तिची आई आणि भाऊ खूप खुश झाले. बिग बॉस 11चा किताब शिल्पाच्या हातात आला. यात बक्षिस म्हणून तिला ट्रॉफी आणि 44 लाख रुपये मिळाले आहेत.

बिग बॉसच्या घरात अतिशय ईमानदार, नात्यांना घेऊन तिचे घरांच्याविषयी आणि तिच्या मित्रपरिवारांविषयी विचार या सिझनमध्ये पहायला मिळाले. या सिझनमध्ये विकास गुप्ता सोबतची तिची भांडण आणि त्यांच्यातल्या नात्याविषयी खूप चर्चा रंगल्या. आताही विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे लग्न करणार का या चर्चांना सोशल मीडियावर जोर आहे. पण सध्या हे सगळं बाजूला ठेवून तिच्या यशाचं कौतुक आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमतकडून शिल्पा शिंदेच्या या विजयासाठी तिला खूप खूप शुभेच्छा.

First published: January 15, 2018, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading