मुंबई, 23 नोव्हेंबर- 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) ची स्पर्धक असलेल्या उर्फी जावेदचा (Urfi Jawed) शोमधील प्रवास फक्त 1 आठ्वड्याचाच असेल. पण शोनंतर ती इतकी प्रसिद्धीझोतात आली की आता तिची सर्वत्र चर्चा आहे. उर्फी जावेद तिच्या नवनवीन लूकमुळे रोज चर्चेत असते. उर्फी तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. आणि आता ती पुन्हा एकदा तेच करताना दिसत आहे. अलीकडेच उर्फी जावेदने असा ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या (Trolle) निशाण्यावर आली आहे.
View this post on Instagram
नुकताच उर्फी जावेद एयरपोर्टवर स्पॉट झाली तेव्हा उर्फीने आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले. यादरम्यान उर्फीने 'सी-थ्रू' ब्लॅक टॉप आणि काळी पँट घातली होती. या ड्रेसमध्ये उर्फीचा वरचा भाग सर्व बाजूंनी पारदर्शक होता. यातच ती पापाराझींना पोझ देताना दिसून आली. त्यामुळे ती पुन्हा एकदा प्रचंड ट्रोल होऊ लागली आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्फी जावेदचा हा लूक पाहून यूजर्स म्हणाले की ती किम कार्दशियन बनण्याचा प्रयत्न करत आहे. उर्फीच्या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट करत तिच्या लूकवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
एवढेच नाही तर एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानंतरही उर्फीला ट्रोल केले जात आहे. एयरपोर्टवर, अनेकदा पापाराझींचं लक्ष तिच्याकडे जातं. अनेक यूजर्स असेही म्हणत आहेत की, 'उर्फी एअरपोर्टवर जॉब करते आहे असे दिसत आहे.' तर काही जण अभिनेत्रीच्या या विचित्र लूकवर ट्रोल करत आहेत परंतु, उर्फीने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने कोणालाही आश्चर्यचकित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. उर्फी अनेकदा तिचा आउटफिट फ्लॉंट करताना दिसून येते. तिचा फॅशन सेन्स खूपच बोल्ड आहे. तिच्या या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे.
उर्फी जावेद 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी झाली होती. पण ती लवकरच घरातून बाहेर पडली होती. मात्र अल्पावधीतच तिने सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग वाढवली आहे. उर्फीचे सध्या इंस्टाग्रामवर दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. चाहत्यांचं लक्ष वेधण्यासाठी उर्फी नियमितपणे इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते.उर्फी एक उत्तम गायिका देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिला रॅपिंग आवडते. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. उर्फी जावेदने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्ही शो 'टेढी-मेढी फॅमिली' मधून केली होती. यानंतर 'बडे भैया की दुल्हनिया', 'नामकरण', 'मेरी दुर्गा' आणि 'जीजी माँ' यांसारख्या मालिकांमध्ये काम करून तिने आपली ओळख निर्माण केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg Boss OTT, Entertainment