Home /News /entertainment /

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; NCB ने आणखी एका व्यक्तीला केली अटक

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; NCB ने आणखी एका व्यक्तीला केली अटक

या सिनेमात रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारणार आहे. श्रेयाने यापूर्वी एका वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

या सिनेमात रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारणार आहे. श्रेयाने यापूर्वी एका वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

आतापर्यंत सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीने 7 लोकांना ताब्यात घेतले आहे.

    नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. NCB ने ड्रग्स प्रकरणात सुशांत सिंह राजपूतच्या स्टाफमधील दीपेश सावंत याला अटक केली आहे. यापूर्वी शुक्रवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅमुअल मिरांडा यांना NCB ने ताब्यात घेतलं होतं. आतापर्यंत या प्रकरणात एनसीबीने 7 लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन शोविक, सॅम्युअल आणि जॅद रिंमाडवर आहेत. शनिवारी एजेंसीने दीपेश सावंतला ताब्यात घेतले आहे. त्याची शुक्रवारी चौकशी झाली होती. दीपेशचा जबाब  NDPS अॅक्ट कलम 67 अंतर्गत दाखल करण्यात आला होता आणि त्याला NDPS अॅक्टच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दीपेश सावंतला ड्रग्सची खरेदी आणि हँडलिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला जबाब आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारावर अटक करण्यात आली आहे. यावेळी अधिकारींनी सांगितले की, दीपेशला रविवारी सकाळी 11 वाजता न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. तर रिया चक्रवर्ती रविवारी NCB च्या समोर हजर होईल. NCB चे अधिकारी मुथा अशोक जैन यांनी सांगितले की, रिया आणि शोविक यांना दीपेश सावंत समोर आणण्यात येईल. यापूर्वी एस्पालेड कोर्टाने ड्रग पॅडलर कैजान इब्राहिम, शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडावर निर्णय दिला. शोव‍िक आणि सॅम्युअलला चार दिवसांची एनसीबी कस्टडीत ठेवण्याचा निर्णय सुनावण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या