सुशांतप्रकरणी मोठी अपडेट, बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांना ड्रग पुरवठा करणाऱ्याला पकडलं

सुशांतप्रकरणी मोठी अपडेट, बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांना ड्रग पुरवठा करणाऱ्याला पकडलं

परवेज खान उर्फ चिंकू पठाण असं या अंमली पदार्थ सप्लायरचे नाव असून दक्षिण मुंबईसह बॉलिवूड जगतात हा AK 47 या नावाने कुप्रसिद्ध आहे.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर : रिया अंमली पदार्थ प्रकरणी NCB ने पहिली कारवाई केली आहे. मुंबईत दोन ठिकाणी छापा टाकून एका अंमली पदार्थ सप्लायरला ताब्यात घेण्यात आलं आहे. परवेज खान उर्फ चिंकू पठाण असं या अंमली पदार्थ सप्लायरचे नाव असून दक्षिण मुंबईसह बॉलिवूड जगतात हा AK 47 या नावाने कुप्रसिद्ध आहे.

परदेशातून येणारा गांजा ज्याला doobies असे देखील बोलले जाते. फिल्म जगतातील अनेक कलाकार गांजाचे शौकिन आहेत. हा गांजा चिंकू पठाण सप्लाय करायचा असा संशय NCB होता. तसंच एक मुलगी देखील या अंमली पदार्थ सप्लाय चैनमध्ये असल्याची माहिती NCB ला मिळाली आहे. ती मुलगी कोण? याचा शोध NCB घेते आहे.

चिंकु पठाण हा बॉलिवूड आणि उद्योग जगतातील मोठ्या लोकांच्या घरात काम करणारे तसंच सोबत असणाऱ्यांच्या संपर्कात असतो आणि चिंकू कोड नेम वापरत त्यांना अंमली पदार्थ सप्लाय करतो. NCB ला संशय आहे की याच चिंकू पठाणाने रिया चक्रवर्तीला देखील अंमली पदार्थ सप्लाय केले आहेत आणि सुशांतच्या घरात काम करणारा एक व्यक्ती चिंकूच्या संपर्कात होता असा देखील संशय NCB ला आहे.

तसंच, NCB ला त्यांच्या खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार चिंकू हा गौरव आर्याच्या संपर्कात असायचा. कारण गौरव आर्या हा मोठा हॉटेल व्यावसायिक असून हॉटेल व्यावसायाच्या पार्श्वभूमीवर गौरव आर्या अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवायचा असा संशय NCB ला आहे. गौरव आर्याचे बॉलिवूड आणि उद्योग क्षेत्रात मोठे कनेक्शन असून अनेकांचा त्याच्यावर विश्वास असल्याने त्याच्या मार्फत अंमली पदार्थांची मागणी केली जायची. चिंकू पठाणला NCB ने ताब्यात घेतल्याने गौरव आर्या आणि रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ झाली आहे, तर बॉलिवूड आणि उद्योग जगतातील अनेकजण NCB च्या रडारवर आले आहेत. त्यामुळे येत्या काळात NCB कार्यालयात बॉलिवूड आणि उद्योग जगतातील अनेकजणांना हजेरी लावावी लागण्याची शक्यता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 1, 2020, 5:45 PM IST

ताज्या बातम्या