मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sidharth Shukla प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी गुन्हा नोंदवला, लवकरच मृत्यूचे कारण येईल समोर!

Sidharth Shukla प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी गुन्हा नोंदवला, लवकरच मृत्यूचे कारण येईल समोर!


तर दुसरीकडे, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आणखी एक गोष्ट समोर येत आहे, असे सांगितले जात आहे की, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्ला...

तर दुसरीकडे, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आणखी एक गोष्ट समोर येत आहे, असे सांगितले जात आहे की, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्ला...

तर दुसरीकडे, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आणखी एक गोष्ट समोर येत आहे, असे सांगितले जात आहे की, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्ला...

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 04 सप्टेंबर : प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्ला  (Sidharth Shukla) मृत्यू प्रकरणी पोलीस आता तपासाला लागली आहे. प्रथमदर्शनी सिद्धार्थचा ह्रदविकाराच्या धक्काने मृत्यू झाला आहे. पण, त्याचा विसरा वैद्यकीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे. या चाचणीनंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर येईल.

सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. त्याला तातडीने कुपरू रुग्णालयात दाखल केलं पण त्याला तपासून डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं. दरम्यान, आता सिद्धार्थचा विसरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. केमेकिल एनालिसिस आणि हिस्टोपॅथोलॉजी रिपोर्ट आल्यानंतर सिद्धार्थच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

बापरे..! या स्मार्टफोनवर WhatsApp चालूच शकणार नाही; यादीत तुमचा फोन तर नाही ना?

दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुद्धा सिद्धार्थच्या मृत्यू प्रकरणी अपघाती गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ ज्या दिवशी ह्रदयविकाराचा धक्का आला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला, असं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आढळून आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी नियमांप्रमाणे अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

सिद्धार्थच्या BMW ची मागची काच फुटली होती

तर दुसरीकडे, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आणखी एक गोष्ट समोर येत आहे, असे सांगितले जात आहे की, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्ला त्याच्या बीएमडब्ल्यू (Siddharth Shukla Bmw car)  कारने आपल्या घरी पोहचला, त्यावेळी कारची मागील काच फुटलेल्या अवस्थेत होती. सिद्धार्थच्या गाडीची ती अवस्था पाहून आता बरेच तर्क-वितर्क लावले जात आहेत, सिद्धार्थची काल रात्री कोणाशी भांडण झालं का? किंवा रात्री काय घडले ज्यामुळे त्याच्या कारची मागील काच फुटली? ज्यामुळे तो रात्रभर अस्वस्थ होता?

कुटुंबाचा कोणावरही संशय नाही

सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कोणावरही संशय नसल्याचे सांगितले आहे. कूपर हॉस्पिटलचे डॉ. निरंजन यांनी त्याच्या मृत्यूबाबत डेथ बिफोर अरायव्हल सांगितले आहे. सध्या सिद्धार्थच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे. पोलीसही आता सक्रिय झाले आहेत आणि त्याच्या घरी पोहोचून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला.

झोपण्यापूर्वी औषध?

मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री घरी परतल्यानंतर सिद्धार्थ खोलीत गेला आणि झोपेच्या आधी काही औषध खाल्ले. तो सकाळी उठलाच नाही, तेव्हा त्याला बेशुद्ध अवस्थेत मुंबईच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले. तिथं नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.

 

'सिद्धार्थचा मृत्यू Heart attack मुळे होऊच शकत नाही'

तर दुसरीकडे, सिद्धार्थ शुक्लाचा जिम ट्रेनर सोनू चौरसियाने न्यूज 18 शी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सिद्धार्थच्या मृत्यूला हार्ट अटॅक कारणीभूत आहे, हे फेटाळलं आहे. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. सिद्धार्थला आपण गेल्या दीड वर्षांपासून जिम ट्रेनिंग देत होतो. तो फिट होता आणि फिटनेसबाबत तो खूप जागरूक होता. जिममध्ये तो खूप हार्ड वर्क करायचा, असं त्यांनी सांगितलं.

First published: