Home /News /entertainment /

Lata Mangeshkar Health बाबत मोठी अपडेट;...म्हणून 2 दिवसांपूर्वी लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला

Lata Mangeshkar Health बाबत मोठी अपडेट;...म्हणून 2 दिवसांपूर्वी लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला

गेल्या 21 दिवसांपासून लता दीदींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. मात्र तरीही पुढील काही दिवस त्यांना ICU मध्ये ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

    मुंबई, 29 जानेवारी : गेल्या 21 दिवसांपासून देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Update on Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईच्या (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. लता दीदींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी चाहते प्रार्थना करीत आहेत. (Big update about Lata Mangeshkar Health; 2 days ago Lata Didis ventilator support was removed ) दरम्यान डॉक्टर प्रतीत यांनी सांगितलं की, लता दीदी व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढून टाकण्यात आला. त्यांच्या तब्येतीत सुधार असल्यामुळे व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आला आहे. डॉक्टरांनी पुढे असंही सांगितलं की, तरीही पुढील काही दिवस लता दीदी आयसीयूमध्ये राहतील आणि डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतील. त्यांच्या प्रकृती थोडा सुधार दिसून येत आहे. ही बाब चाहत्यांसाठी दिलासादायक आहे. हे ही वाचा-Lata Mangeshkar यांची प्रकृती स्थिर पण...; डॉक्टरांनी दिली नवी Update लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली म्हटल्यावर त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मिडीयावर अनेक व्हायरल मेसेज येत होते. यानंतर मंगेशकर कुटुंबाच्यावतीने चुकीच्या बातम्या पसरू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या