मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : रणवीर सिंह महिला स्पर्धकाच्या समोर झाला नतमस्तक, हात जोडत म्हणाला हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट

VIDEO : रणवीर सिंह महिला स्पर्धकाच्या समोर झाला नतमस्तक, हात जोडत म्हणाला हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट

छोट्या पडद्यावरील 'द बिग पिक्चर' हा (The Big Picture) रणवीर सिंहचा शो प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. अनेकवेळा स्पर्धकांचे दुःखद किस्से ऐकून रणवीर सिंह (Ranveer Singh) भावूक होतो. यावेळीही असेच काहीसे घडले.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 5 डिसेंबर- छोट्या पडद्यावरील 'द बिग पिक्चर' हा (The Big Picture) रणवीर सिंहचा शो प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. जिथे स्पर्धक केवळ फोटोंशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत नाहीत तर ते त्यांच्या आयुष्यातील आश्चर्यकारक आणि अनोख्या गोष्टी लोकांसोबत शेअर करतात. या शोच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यातील अनेक रंग पाहण्याची संधी मिळाली आहे. अनेकवेळा स्पर्धकांचे दुःखद किस्से ऐकून रणवीर सिंह (Ranveer Singh) भावूक होतो. यावेळीही असेच काहीसे घडले. रणवीर सिंहच्या शोच्या पुढच्या एपिसोडचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका महिला स्पर्धकाशी बोलताना रववीर सिंह भावूक होतो. व्हिडिओमध्ये रणवीर स्पर्धकाला त्यांच्या सून आणि मुलाबद्दल विचारताना दिसत आहे. यावेळी ही महिला सांगते की, त्यांचा मुलगा आणि सून फक्त चार महिने एकत्र राहू शकले. त्यांच्या मुलाचे काय झाले हे प्रोमो व्हिडिओवरून स्पष्ट झालेले नाही. हे शो बघूनच समजणार आहे.यावेळी ही महिला पुढे सांगताना दिसत आहे की, मी माझी सून कोमल हिचे दुसरे लग्न केले आहे. हे ऐकून रणवीर म्हणतो की, आईने मुलीचे लग्न केले असे नेहमी ऐकतो, पण सासूने पुन्हा सुनेचे लग्न केले असे क्वचितच ऐकायला मिळते.' यानंतर ही महिला देखील भावूक होते आणि रडू लागतात. यानंतर रणवीरच्या डोळ्यातही अश्रू येतात. वाचा : Money Laundering Case : जॅकलिन फर्नांडिस होती परदेशात जाण्याच्या तयारीत, मुंबई विमानताळवरून घेण्यात आलं ताब्यात रणवीर झाला नतमस्तक यावेळी महिला स्पर्धक म्हणते की, 'सून आता आनंदी आहे. ती आनंदी आहे म्हणून आम्ही देखील आनंदी आहे. यानंतर रणवीर देखील म्हणते की, खरचं मी तुमच्यासमोर नतमस्तक झालो. कर्लस टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, पाहा रोमाजी यांचा सासू ते आई असा अनोखा प्रवास फक्त ‘द बिग पिक्चर’ वर.
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

मान घालून हात जोडून डोके टेकवले आणि म्हणतो, 'माझं डोकं तुझ्यापुढे झुकलं...' प्रोमो व्हिडिओ कलर्स टीव्हीवरून शेअर केला आहे. त्याचे अधिकृत इंस्टाग्राम खाते. ज्याचे कॅप्शन लिहिले आहे, 'रोमा जीचा सासू ते आईपर्यंतचा प्रवास पाहा, फक्त 'द ‘द बिग पिक्चर’ बिग पिक्चर' वर. वाचा : 'थोडी तर लाज बाळग'; उर्फी जावेद पुन्हा विचित्र कपड्यामुळे ट्रोल, video viral रणवीर '83' मध्ये दिसणार प्रोमो व्हिडिओ सुमारे 6 तासांपूर्वी शेअर करण्यात आला होता. ज्यावर 77 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. कतरिना कैफ, सलमान खान, रोहित शेट्टी सारखे सेलेब्सनी शोच्या स्टेजवर पाहुणे म्हणून हजरी लावली आहे. कामाबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंह लवकरच '83' चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्याचा लूक चांगलाच आवडला आहे.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Ranveer singh, TV serials

पुढील बातम्या