मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉलिवूडमधून मोठी बातमी! Vikcy Kaushal आणि Katrina Kaif यांनी गुपचूप उरकला साखरपूडा?

बॉलिवूडमधून मोठी बातमी! Vikcy Kaushal आणि Katrina Kaif यांनी गुपचूप उरकला साखरपूडा?

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या अफेअरची तुफान चर्चा मागच्या काही काळापासून रंगत आहेत.

  • Published by:  News Digital
मुंबई 18 ऑगस्ट : बॉलिवूडमध्ये सध्या एका नव्या कपलची गेले काही महिने जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या अफेअरची तुफान चर्चा मागच्या काही काळापासून रंगत आहेत. तर आता आणखी एक बातमी समोर येत आहे की म्हणजे या लव्ह बर्ड्सनी गुपचूप साखरपुढा (Vicky - Katrina engagement) केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना जणू सुखद धक्काच मिळाला आहे. मागील वर्षभारापासून विकी आणि कतरिना डेट करत असल्याचं समजत होतं. अनेकदा ते एकत्र स्पॉट देखील झाले होते. तर नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रिमियरलाही दोघेही एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते. तर आता त्यांच्या साखपुड्याची बातमी मिळत आहे. विरल भायनीच्या पोस्टनुसार त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

अभिनेता रणबीर कपूरची ब्रेकअप झाल्यानंतर गेली काही वर्षे कतरिना सिंगल होती. तर विकी आणि कतरिनाचे जुळलेले सूत हे अनेकांसाठी सुखद धक्काच होता. त्या दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. पण अद्याप या साखरपुड्याच्या बातमीवर कोणताही अधीकृत घोषणा करण्यात आली नाही.
मागील काही महिन्यांपूर्वी अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा व विकी आणि कतरिनाचा मित्र हर्षवर्धन कपूर (Harshavardhan Kapoor) यानेही एका मुलाखतीत विकीआणि कतरिनातच्या नात्यावर भाष्य केलं होतं. व ते एकत्र असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे विकी आणि कतरिना डेट करत असल्याचं जणू प्रमाणपत्रचं त्यांच्या चाहत्यांना मिळालं होतं. तर आता त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीने एकच धक्का दिला आहे.
First published:

Tags: Bollywood, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

पुढील बातम्या