मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

CBI च्या निष्कर्षानंतर सुशांत सिंहच्या कुटुंबातील मोठी बातमी; मोठा भाऊ रुग्णालयात दाखल

CBI च्या निष्कर्षानंतर सुशांत सिंहच्या कुटुंबातील मोठी बातमी; मोठा भाऊ रुग्णालयात दाखल

सेंट्रल ब्‍यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) लवकरच संपूर्ण प्रकरणाचा तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे.

सेंट्रल ब्‍यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) लवकरच संपूर्ण प्रकरणाचा तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे.

सेंट्रल ब्‍यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) लवकरच संपूर्ण प्रकरणाचा तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे.

    पाटना, 15 ऑक्टोबर :  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या भावाला रुग्णालयात हलविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत यांचा चुलत भाऊ आणि बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील छातापुरचे भाजप आमदार नीरज बबलू (BJP  MLA Neeraj Bablu) यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सांगितलं जात आहे की, भाजप आमदार (BJP MLA) यांना बुधवारी सायंकाळी हार्टअटॅक आला होता. ज्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं. कुटुंबीयांनी सांगितले की सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सांगितले जात आहे की, भाजप आमदार नीरज बबलू यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयची चौकशीची मागणी केली होती. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वैयक्तिक रुपात सीबीआय तपास करण्याची मागणी केली होती. ते सुशांतच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईलाही आले होते. हे ही वाचा-सलमान भरतोय अभिनेत्याचे मेडिकल बिल्स, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव बुधवारी बिहारमध्ये आमदारकीच्या निवडणुकांसाठी भाजपने 35 उमेदवारांची सूची जारी केली आहे. या लिस्टमध्ये सुशांत सिंह राजपूत यांचे भाऊ नीरज सिंह यांना तिकीट देण्यात आलं आहे. नीरज सिंह यांना छातापुर विधानसभासाठी भाजपने उमेदवारी दिली आहे. नीरज सिंह या सीटवरुन तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. राज्यात तीन टप्प्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यात 71 जागांवर 28 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्यांतर्गत 94 जागांवर 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 78 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मत मोजणी 10 नोव्हेंबर रोजी होईल व निकाल समोर येईल. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput death case) याच्या मृत्यूला 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. 14 जून रोजी सुशांत आपल्या वांद्रे येथील घरी मृत अवस्थेत सापडला. या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सेंट्रल ब्‍यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) लवकरच संपूर्ण प्रकरणाचा तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने सुशांतच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही खडबड झाली नसल्याचे सांगितले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या