मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'माझ्या मित्राचा श्वास गुदमरतोय...'; अभिनेत्रीने सोशल मीडियावर मदतीसाठी पसरले हात

'माझ्या मित्राचा श्वास गुदमरतोय...'; अभिनेत्रीने सोशल मीडियावर मदतीसाठी पसरले हात

अभिनेत्री निकिता दत्ताने (Nikita dutta) आपल्या मित्राला मदत मिळावी यासाटी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अभिनेत्री निकिता दत्ताने (Nikita dutta) आपल्या मित्राला मदत मिळावी यासाटी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अभिनेत्री निकिता दत्ताने (Nikita dutta) आपल्या मित्राला मदत मिळावी यासाटी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

    मुंबई, 28 एप्रिल : कोरोनामुळे (Coronavirus)देशातील स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. सर्वसामान्य नागरिक असो वा विशेष नागरिक सर्वजण उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उंबरठे झिजवत आहेत. कुठे बेड नाही तर कुठे आक्सिजन नाही,अशी स्थिती संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. या स्थितीत अनेक सामाजिक संस्था, बॉलिवूड कलाकार, सेलिब्रेटीज, उद्योगपती मदतीसाठी पुढे आले आहेत. ते लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आता एका अभिनेत्रीने आपल्या मित्रासाठी सोशल मीडियावर मदतीसाठी हात पसरले आहेत. अभिनेत्री निकिता दत्ताने (Nikita Dutta) सोशल मीडियावर मदत मागितली आहे.

    द बिग बुल (The Big Bull) या चित्रपटातील अभिनेत्री निकिता दत्ता. सध्या तिच्या मित्राची स्थिती गंभीर आहे. मित्राची ही स्थिती पाहून निकिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली आहे.

    निकिताने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "जुहू क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये असलेल्या माझ्या मित्राला श्वास घ्यायला जमत नाही आहे. त्याला तातडीच्या मदतीची नितांत गरज आहे. कोणी जर यासाठी पुढाकार घेतलं तर मोठी मदत होईल. आयटोलिजेक (100mg) आणि टोउलीजुमॅब (400mg) किंवा एक्टेमेरा (400mg) या इंजेक्शन्सची तातडीनं गरज आहे"

    हे वाचा - शेवटच्या क्षणी इरफान खान काय म्हणाला होता? एक वर्षानंतर मुलगा बाबिल झाला व्यक्त

    निकिता ही अभिषेक बच्चनच्या द बिग बुल मध्ये दिसली होती. ती शाहीद कपूरच्या कबीर सिंह (Kabir Sing) या चित्रपटात देखील होती. अक्षय कुमारच्या गोल्ड (Gold) या चित्रपटातही तिने भूमिका केली आहे. तसंच ती लस्ट स्टोरीज या वेबसीरिजमध्ये (Lust Stories)देखील दिसली होती.

    कोरोनाकाळात बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यामध्ये सोनू सुद, गुरमीत चौधरी, अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण यांचा समावेश आहे.

    First published:

    Tags: Bollywood, Coronavirus, Entertainment