बाॅलिवूड शहेनशहाच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

बाॅलिवूड शहेनशहाच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

अमिताभचं नाव इंकलाब ठेवलं होतं. पण कवी सुमित्रानंदन पंतच्या सल्ल्यावरूनच हरिवंश राय यांनी अमिताभ नाव ठेवलं.

 • Share this:

 11 आॅक्टोबर : अमिताभ बच्चन. बहुआयामी व्यक्तिमत्त्व. प्रत्येक वयोगटातले अमिताभचे फॅन्स आहेत. बिग बी नावाचं गारुड प्रत्येकाच्या मनावर पसरलंय. याच बिग बींच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी

 1. अमिताभचं नाव इंकलाब ठेवलं होतं. पण कवी सुमित्रानंदन पंतच्या सल्ल्यावरूनच हरिवंश राय यांनी अमिताभ नाव ठेवलं
 2. त्यांचं आडनाव श्रीवास्तव होतं. पण हरिवंश राय यांनी बच्चन ठेवलं. अमिताभनं ते पुढे चालू ठेवलं.
 3. त्यांचं शिक्षण दिल्लीच्या किरोडीमल काॅलेजमध्ये झालं
 4. आर्टसमध्ये त्यांनी मास्टर डिग्री घेतलीय.
 5. त्यांना भारतीय वायुसेनेत जायचं होतं. पण ते शक्य झालं नाही.
 6. त्यांनी पहिली नोकरी केली ती दारूच्या कंपनीत.
 7. त्यांची पहिली कार सेकंड हँड फियाट होती.
 8. आॅल इंडिया रेडिओनं आॅडिशननंतर त्यांचा आवाज नाकारला होता.
 9. संघर्षाच्या काळात त्यांनी अनेक रात्री मरिन ड्राइव्हवरच्या एका बेंचवर काढल्या होत्या.
 10. 1969मध्ये मृणाल सेन यांच्या भुवन शोममध्ये व्हाॅइस नॅरेटर होते.
 11. त्यांनी सत्यजीत राय यांच्या सिनेमातही व्हाॅइस नॅरेशनचं काम केलंय.
 12. सात हिंदुस्तानी त्यांचा पहिला सिनेमा
 13. पहिल्या सिनेमातून त्यांना एक हजार रुपये मिळाले होते.
 14. स्ट्रगलच्या काळात ते मेहमूदच्या घरी राहायचे.
 15. सुपरहिट जंजीरच्या आधी त्यांचे 12 सिनेमे फ्लाॅप झाले होते.
 16. 20पेक्षा जास्त सिनेमांमध्ये त्यांचं नाव विजय होतं.
 17. जया बच्चन यांच्याशी त्यांची पहिली मुलाखत पुण्यात एफटीआयमध्ये झाली.
 18. 1973मध्ये दोघांचं लग्न झालं.
 19. हृषिकेश मुखर्जींनी जया आणि अमिताभ यांच्यातल्या महत्त्वाच्या दुव्याचं काम केलं होतं.
 20. अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांची मैत्री होती. तिथूनच ते राजकारणात आले.
 21.  इलाहाबादमधून त्यांनी निवडणूक लढवली. आणि ते जिंकलेही.
 22. 1999मध्ये बीबीसी इंडियानं शोले सिनेमाला फिल्म आॅफ द मिलेनियम घोषित केलं.
 23. अमिताभ बच्चननी बाॅलिवूडमध्ये सर्वात जास्त सिनेमे केले.
 24. 1996मध्ये त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली.
 25. 1996ची मिस वर्ल्ड स्पर्धा या कंपनीनं स्पाॅन्सर केली होती.
 26. त्यात कंपनीचं खूप नुकसान झालं. 1997मध्ये ही कंपनी बंद पडली
 27. 2013मध्ये द ग्रेट गॅटसबी या हाॅलिवूड सिनेमातून त्यांनी हाॅलिवूड डेब्यू केला.
 28. फ्रान्स सरकारनं त्यांना सर्वोच्च नागरिकाचा सन्मान दिला.
 29. 1990मध्ये मृत्युदाता सिनेमातून त्यांनी कमबॅक केलं आणि तेव्हापासून ते बिग बी नावानं प्रसिद्ध झाले.
 30. अमिताभ शाकाहारी आहेत. दारू पित नाहीत.
 31. अमिताभ दोन्ही हातानं लिहू शकतात.
 32. त्यांना लेखण्या जमा करायचा छंद आहे. त्यांच्याकडे एक हजाराहून जास्त लेखण्या आहेत.
 33. 2002मध्ये त्यांनी सोल करी फाॅर यू अँड मी नावाचं पुस्तक लिहिलं.
 34. आॅस्ट्रेलियात ट्रोब विद्यापिठात त्यांच्या नावानं स्काॅलरशिप सुरू केलीय.
 35. ट्विटरवर त्यांचे जास्त फाॅलोअर्स आहेत.

 

First published: October 11, 2017, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading