Home /News /entertainment /

BREAKING: NCB कडून आणखी एका ड्रग पेडलरला मुंबईतून अटक, रिया-सुशांत प्रकरणाशी थेट संबंध

BREAKING: NCB कडून आणखी एका ड्रग पेडलरला मुंबईतून अटक, रिया-सुशांत प्रकरणाशी थेट संबंध

NCB ने मुंबईत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. NCB ने नुकत्याच केलेल्या कारवाईनुसार रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणाऱ्या व्यक्तीला, ड्रग्स सप्लाय करणाऱ्या एका पेडलरला अटक करण्यात आली आहे.

मुंबई, 9 डिसेंबर : NCB ने मुंबईत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. NCB ने नुकत्याच  केलेल्या कारवाईनुसार रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणाऱ्या व्यक्तीला, ड्रग्स सप्लाय करणाऱ्या एका पेडलरला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने ड्रग पेडरर रिगल महाकालाल (Rigel Mahakala) अटक केली आहे. अनुज केशवानी (Anuj Keshwani) जो रिया आणि सुशांतला  ड्रग्ज पुरवठा करायचा, त्या अनुजला, रिगलकडून ड्रगचा सप्लाय होत होता. रिगलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अंधेरी पश्चिम भागात एनसीबीकडून छापेमारी केली जात आहे. उच्च प्रतीची मलाना क्रिम आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एनसीबी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिगल महाकाला बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींशीही जोडलेला आहे. एनसीबी गेल्या अनेक काळापासून रिगलच्या शोधात होती.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Bollywood, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या