बिग बाॅस मराठीच्या फिनालेकडे पुष्कर जोगच्या बायकोनं का फिरवली पाठ?

एक चर्चा खूप रंगली. ती म्हणजे, पुष्कर जोगची बायको बिग बाॅसच्या ग्रँड फिनालेला का बरं आली नव्हती?

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2018 11:35 AM IST

बिग बाॅस मराठीच्या फिनालेकडे पुष्कर जोगच्या बायकोनं का फिरवली पाठ?

मुंबई, 04 आॅगस्ट : बिग बाॅसचा फिनाले चांगलाच रंगला. त्यानंतरही महेश मांजरेकरांकडेही ग्रँड पार्टी झाली. अनेक रुसवे फुगवे झाले. म्हणजे स्मिताच्या पार्टीला मेघानं पाठ फिरवली. पुष्करही नव्हता आला. बिग बाॅसच्या घरातही आपण बरीच नाट्य पाहिली. पण एक चर्चा खूप रंगली. ती म्हणजे, पुष्कर जोगची बायको बिग बाॅसच्या ग्रँड फिनालेला का बरं आली नव्हती? पुष्करची बायको जास्मिन बिग बाॅसच्या घरात त्याला भेटून आली होती. पण ती फिनालेला दिसली नाही म्हणून उलटसुलट चर्चा सुरू होती.

बिग बाॅसच्या घरात पुष्कर आणि सई यांची जवळीकही खूप होती. त्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. एका मुलाखतीत सईनं 'पुष्करचं लग्न झालं नसतं तर आम्ही विचार केला असता' असं म्हटल्यावर एकच खळबळ उडाली होती. या सगळ्या कारणानं जास्मिन नाराज आहे, अशी चर्चाही सुरू होती.

आता मात्र पुष्करनंच सगळा खुलासा केला. तो म्हणाला, ' आमची मुलगी सहा महिन्याची आहे. तिला त्यावेळी लसी देण्यात आल्या होत्या. तिला त्यामुळे ताप आला होता. फिनालेचं शूटिंग सकाळी 9वाजल्यापासून सुरू होतं आणि दिवसभर चालणार होतं. त्यामुळे जास्मिनला यासाठी बोलावणे शक्य नव्हतं. म्हणून ती फिनालेला आली नव्हती.'

जास्मिन आणि पुष्कर एका विमानप्रवासात भेटले. जास्मिन ही एअर हाॅस्टेट आहे. दोघांचं प्रेम जुळलं. आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं.

बिग बाॅस फिनालेमध्ये स्मिता, सई, मेघा सगळ्यांच्या घरातले आले होते. त्यामुळेच पुष्करच्या बायकोची अनुपस्थिती सगळ्यांच्या नजरेत आली. मग गाॅसिप सुरू व्हायला थोडाच वेळ लागतोय. पण आता पुष्करच्या या खुलाशानं सत्य कळलं.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 11:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...