बिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली

बिग बाॅस मराठीच्या होस्टचा 'हा' पोशाख पाहून उत्सुकता वाढली

या शोचं प्रोमो शूट नुकतंच झालं. त्यावेळचा महेश मांजरेकर यांचा फोटो बाहेर आलाय.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : बिग बाॅस मराठीचं पहिलं पर्व यशस्वी झालं. कलर्स मराठीनं दुसऱ्या पर्वाची घोषणा केली होती. तेव्हापासून सगळ्यांना उत्सुकता होती ती नव्या पर्वाचा होस्ट कोण? मध्यंतरी दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या नावाचीही खूप चर्चा होती. पण आता सूत्रसंचालक कोण याचं कुतूहल संपलंय.

गेल्या वेळचेच होस्ट महेश मांजरेकर याही वेळी सूत्रसंचालन करणार आहेत. या शोचं प्रोमो शूट नुकतंच झालं. त्यावेळचा महेश मांजरेकर यांचा फोटो बाहेर आलाय. ते राजकीय वेशभूषेत दिसतायत. त्यामुळे यावेळच्या बिग बाॅसमध्ये एखादी राजकीय व्यक्ती तर नाही ना, याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता वाढलीय.

यावेळी या शोमध्ये कोण भाग घेणार, याबद्दल बरीच नावं समोर येतात. पैकी केतकी माटेगांवकरचं नावही पुढे आलं होतं. पण तिनं ट्विट करून आपण या शोमध्ये नाही, हे सांगितलंय. शनाया फेम रसिका सुनीलचंही नाव पुढे होतं. पण ती तर सध्या अमेरिकेला आहे आणि तिचा अभ्यासक्रम पूर्ण करतेय.

गेल्या वेळच्या बिग बाॅस मराठीत मेघा धाडे विजेती ठरली होती. पुष्कर जोग उपविजेता ठरला होता. अस्ताद काळे, उषा नाडकर्णी, स्मिता गोंदकर, सुशांत शेलार, भूषण कडू, राजेश श्रृंगारपुरे  यांनी बिग बाॅस मराठी गाजवलं होतं. रेशम टिपणीस आणि राजेशबद्दल तर अनेक चर्चा रंगल्या होत्या.

गेल्या वेळची विजेती मेघानं महेश मांजरेकरांचा वाढदिवस थाटात साजरा केला होता. तिनं पंचतारांकित हाॅटेलमध्ये पार्टी दिली होती. त्यावेळी बिग बाॅस मराठीची टीम उपस्थित होती.

मेघाचे तिचे खास मित्र सई आणि पुष्कर मात्र या पार्टीत गैरहजर होते. या दोघांना मेघाने आमंत्रण देऊन देखील या दोघांनी या पार्टीत न येण्याचा निर्णय घेतला होता.

VIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप

First published: April 20, 2019, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading