मेघानं नंदकिशोरच्या डोक्यावर का फोडलं अंड?

मेघानं नंदकिशोरच्या डोक्यावर का फोडलं अंड?

आज बिग बाॅसमध्ये सर्वात हटके कार्यक्रम होणार तो म्हणजे होऊ दे चर्चा. त्यात आस्ताद मंगळावर पोचला, तर पुष्करनं बिकनी घातली.

  • Share this:

मुंबई, 27 जून : कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामध्ये  काल दोन टास्क रंगले. सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊन आता ७० दिवस झाले. तेव्हा कोणी कोणी काय काय केलं, कसे चर्चेत आले यानुसार त्यांची क्रमवारी ठरवायची होती. यानुसार रेशम पहिल्या क्रमांकावर, मेघा, पुष्कर, सई आणि अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर उभे राहिले.

आज बिग बाॅसमध्ये सर्वात हटके कार्यक्रम होणार तो म्हणजे होऊ दे चर्चा. त्यात आस्ताद मंगळावर पोचला, तर पुष्करनं बिकनी घातली. आऊ म्हणजे उषा नाडकर्णी आणि शर्मिष्ठाचं जोरदार भांडण झालं, म्हणजे तसं झाल्याचं त्यांनी नाटक वठवलं. मेघा आणि रेशमनं आस्तादला जास्त ब्रेकिंग न्यूज दिल्याचं सांगितलं. मग पुष्कर रिपोर्टर आणि आस्ताद कॅमेरापर्सन बनला.

पुढच्या महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा ?

आमिर खान ओशोंच्या भूमिकेत?

आता घरी मोबाईलवरही बनवू शकता पासपोर्ट !

आज बिग बाॅसच्या या घरात बरंच काही घडणार आहे. सईचे फोटो कोणी लपवलेत. त्याबद्दल ती आस्ताद आणि स्मिताला विचारणार. मग सई आणि स्मितामध्ये कडाक्याची भांडणं होणार आहेत. सई नंदकिशोरच्या डोक्यावर पिठ टाकणार, तर मेघा अंडं फोडणार. पुष्कर जोग वॅक्सिंग करणार. मोठमोठ्या फिलाॅसाॅफ्या झाडणार.

होऊ दे चर्चा या साप्ताहिकासाठी जास्तीत जास्त ब्रेकिंग न्यूज कोण देतं, यासाठी हा आटापिटा आहे. यात जो बाजी मारेल तो कॅप्टन. आणि ते आजच्या बिग बाॅस मराठीत पहायला मिळेल.

First published: June 27, 2018, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading