मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss Marathi: नॉमिनेशनमध्ये मीरा उत्कर्षला सपोर्ट करणार नाही, कोणाचं घेणार नाव?

Bigg Boss Marathi: नॉमिनेशनमध्ये मीरा उत्कर्षला सपोर्ट करणार नाही, कोणाचं घेणार नाव?

Bigg Boss Marathi च्या नॉमिनेशन प्रक्रियेत मीर उत्कर्षला सपोर्ट करणार नाही. तिनं उत्कर्षाला याबद्दल तोंडवर सांगितलं आहे. त्यामुळं आता मीरा नॉमिनेशन प्रक्रियेत कुणाच नाव घेणार हे पाहणं उत्सुकतचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi च्या नॉमिनेशन प्रक्रियेत मीर उत्कर्षला सपोर्ट करणार नाही. तिनं उत्कर्षाला याबद्दल तोंडवर सांगितलं आहे. त्यामुळं आता मीरा नॉमिनेशन प्रक्रियेत कुणाच नाव घेणार हे पाहणं उत्सुकतचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi च्या नॉमिनेशन प्रक्रियेत मीर उत्कर्षला सपोर्ट करणार नाही. तिनं उत्कर्षाला याबद्दल तोंडवर सांगितलं आहे. त्यामुळं आता मीरा नॉमिनेशन प्रक्रियेत कुणाच नाव घेणार हे पाहणं उत्सुकतचं ठरणार आहे.

मुंबई, 8 नोव्हेंबर:  बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3 )घरामध्ये सदस्यांना कोणचा पाठिंबा आहे आणि कोणाचा नाही हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. कधी कधी एखादा सदस्य चांगला स्पर्धक आहे म्हणून तर कधी आपली मैत्री आहे म्हणून तर कधी दिलेला शब्द पाळण्यासाठी अशा अनेक कारणास्तव सदस्य घरातील दुसर्‍या सदस्याला वाचवतात. आणि काही कारणांसाठी नॉमिनेशनमध्ये टाकतात. फक्त नॉमिनेशनच नाही तर आपल्या जवळचा माणूस या बिग बॉस मराठीच्या घरात आपल्यासोबत असण खूप महत्त्वाचं असतं. आज मीरा आणि उत्कर्ष याचविषयी चर्चा करताना दिसणार आहेत.

मीरा उत्कर्षशी बोलताना म्हणाली, जे काही झालं, आपण सगळे वेगळे झालो ठीक आहे. जय आणि स्नेहा एकमेकांसाठी असणार आहेत पुढे... तुझ्याबरोबर कोण आहे ? उत्कर्ष म्हणाला, तू. मीरा म्हणाली, नाही... मी आणि गायत्री आम्ही दोघी तुला सपोर्ट करायचो. मग आता असं वागल्यावर नाही करणार तुला सगळ्यांसमोर सपोर्ट. उत्कर्ष म्हणाला, नका करू, तुम्ही तुमचा गेम खेळाना... मीरा म्हणाली, मी सांगते आहे तुला हे... मी माझा खेळतेच आहे. उत्कर्ष म्हणला, तुला काय वाटतं माझ्या डोक्यात हा विचार नाही आला ? पण गायत्रीचं डामाडोल मला वाटतं आहे बरं का... म्हणजे मला तिची चिंता वाटते आहे.

तिची जी खेळण्याची पध्दत आहे ना... मीरा म्हणाली, ती ज्या पध्दतीने दोन आठवड्यापासून वागते आहे. मी तिला सरळ म्हंटल आहे पुढे मला असं काही वाटलं तर मी कोणाचं पण नावं घेईन. असं मी तिच्यावर तोंडावर बोलले आहे. मी फेअर खेळणार आहे.

वाचा : ...म्हणून माधुरी दिक्षितच्या मुलाने वाढवले होते केस, अभिनेत्रीने शेअर केला Video

दरम्यान, 19 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठी सीजन 3 (Bigg Boss Marathi 3) सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जावं लागणार आहे.

वाचा : कंगना,पी व्ही सिंधूसह 119 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

आता कोण कोणाला सपोर्ट देणार ? कोणकोणाच्या विरोधात जाणार ? बघूया. तेव्हा जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिजन तिसरा दररोज रात्री कलर्स मराठीवर.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment