मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi ला मिळाले टॉप 5, शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथ OUT

Bigg Boss Marathi ला मिळाले टॉप 5, शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथ OUT

मराठी बिग बॉसचा तिसरा (bigg boss marathi 3) सिजन लवकरच संपणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.

मराठी बिग बॉसचा तिसरा (bigg boss marathi 3) सिजन लवकरच संपणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.

मराठी बिग बॉसचा तिसरा (bigg boss marathi 3) सिजन लवकरच संपणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.

  मुंबई, 23 डिसेंबर - मराठी बिग बॉसचा तिसरा (bigg boss marathi 3) सिजन लवकरच संपणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात टॉप सहा असलेल्या सर्वच सदस्यांचे बिग बॉसने कौतुक केले आहे. मात्र या सहा सदस्यामधून एका सदस्याला घराबाहेर जावे लागणार आहे. हे बिग बॉसच्या घरातील शेवटचे एलिमिनेशन असणार आहे. या शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) घराबाहेर पडली आहे. तिचा या घऱातील खेळ संपला आहे. आता बिग बॉस मराठीला त्यांचे टॉप फाईव्ह मिळाले आहेत. यापैकी विशाल निकम हा एकच सदस्य असा आहे जो फायनलमध्ये पोहोचला आहे. आता यापैकी एक विजेता असणार आहे. या एलिमिनेशन राउंडमधून बाहेर पडण्यासाठी बिग बॉसने पाचही सदस्यांना गार्डन एरियात बोलावले . तिथे एका पटावर ह्या पाचही सदस्यांना उभे राहावे लागले. त्यातुन एक स्पर्धक बाद झाला. जो एलिमिनेट होऊन बिग बॉसच्या घरातून आज बाहेर पडेल असे वाटते. आजवरच्या एकंदरीत खेळावर प्रेक्षकांनी सर्वांना भरभरून सपोर्ट केला आहे. आज शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथला घराबाहेर पडावे लागले. त्यामुळे विशाल सह आता विकास, जय, उत्कर्ष, मीनल हे पाच सदस्य फायनलमध्ये पोहोचले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  बिग बॉसच्या घ​​रात शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा घरातून बाहेर पडली आहे. त्यामुळे तिचा फायनलमध्ये जाण्याचा प्रवास आता इथेच संपला आहे. रविवारी विशेष भागात बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता घोषित करण्यात येणार आहे. विशाल, मीनल, विकास, उत्कर्ष आणि जय या पाच सदस्यांमध्ये कोणता सदस्य विजेता होणार याची प्रेक्षक आता अतुरतेने वाट पाहत आहेत. वाचा-यशपाल शर्मांच्या आठवणीत कपिल देव भावुक, रणवीर सिंहलाही अश्रू अनावर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून मीराने मराठी टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला. या टीव्ही मालिकेत तिने संजना ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही छोटीशी भूमिका होती. या भूमिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.“येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत तिने मोमोची भूमिका साकारली होती. या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या