मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss Marathi' मुळे मीरा जगन्नाथला परत मिळालं आई वडिलांचं प्रेम, शेतकरी वडिलांचा Video पाहून डोळे येतील भरून

Bigg Boss Marathi' मुळे मीरा जगन्नाथला परत मिळालं आई वडिलांचं प्रेम, शेतकरी वडिलांचा Video पाहून डोळे येतील भरून

बिग बॉसच्या शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) घराबाहेर पडली आहे. तिचा या घऱातील खेळ संपला आसला तरी तिनं तिच्या आई वडिलांचे मन, प्रेम देखील जिंकले आहे.

बिग बॉसच्या शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) घराबाहेर पडली आहे. तिचा या घऱातील खेळ संपला आसला तरी तिनं तिच्या आई वडिलांचे मन, प्रेम देखील जिंकले आहे.

बिग बॉसच्या शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) घराबाहेर पडली आहे. तिचा या घऱातील खेळ संपला आसला तरी तिनं तिच्या आई वडिलांचे मन, प्रेम देखील जिंकले आहे.

मुंबई, 24 डिसेंबर- मराठी बिग बॉसचा तिसरा (bigg boss marathi 3) सिजन लवकरच संपणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात टॉप सहा असलेल्या सर्वच सदस्यांचे बिग बॉसने कौतुक केले आहे. बिग बॉसच्या शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) घराबाहेर पडली आहे. तिचा या घऱातील खेळ संपला आहे. मीराच जरी खेळ संपला असला तरी प्रेक्षकांच्या मनात तिचं स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली आहे. यासोबतच तिनं तिच्या आई वडिलांचे मन, प्रेम देखील जिंकले आहे.

मीर जगन्नाथ नेहमी खेळताना आक्रमकपणे खेळायची. पण यामागे एक हळवी मुलगी लपलेली आहे हे अनेकदा टास्कदरम्यान दिसले आहे. मीराने अभिनेत्री होण्यासाठी 2014 मध्ये आई वडिलांचे घर सोडले आणि मुंबई गाठली. आज ती यशस्वी अभिनेत्री असली तरी यासाठी तिला घरच्यांचा पाठिंबा मिळाला नाही. तिचे वडील तिच्यासोबत बोलत नसल्याचे तिनं अनेकदा या शोमध्ये सांगितले. मात्र काल ती घऱातून बाहेर पडली. यावेळी तिच्या आई वडिलांची एक लहानशी क्लिप दाखवण्यात आली. मीराचे वडील शेतकरी आहेत. शेतकरी वडिलांचा हा लेकसाठीचा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणणारा आहे.

वाचा-बिग बॉस मराठीस मिळाले टॉप 5, शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथ out

यावेळी त्यांच्या डोळ्यातील पाणी मीरवरचे प्रेम दर्शवत होते. तसेच यावेळी मीराच्या वडिलांनी तिला मुंबईला भेटण्यासाठी व घरी परत आणण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले. बिग बॉस हा शो लोकप्रियता तर देतोच पण मीराला तिचे आई वडील व त्यांचे प्रेम मिळवूण दिले आहे. खऱ्या अर्थाने तिनं हा शो हारून पण जिंकला आहे.

यावेळी मीराने विशाल हा शो जिंकणार असल्याचे सांगितले. घरातून बाहेर पडल्यानंतर महेश मांजरेकर यांनी मारच्या निर्णयाचे कौतुक केले. तसेच तू करिअरच्या बाबतीत जो निर्णय घेतलास तो देखील योग्य होता असं म्हणत मीराचे कौतुक केले.

वाचा-यशपाल शर्मांच्या आठवणीत कपिल देव भावुक, रणवीर सिंहलाही अश्रू अनावर

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून मीराने मराठी टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला. या टीव्ही मालिकेत तिने संजना ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही छोटीशी भूमिका होती. या भूमिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.“येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत तिने मोमोची भूमिका साकारली होती. या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Entertainment, Marathi entertainment