मुंबई, 23 जानेवारी: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) मधील लोकप्रिय स्पर्धक मीरा जगन्नाथ (Mira Jagannath)लवकरच एका नव्या गाण्यात झळकणार आहे. तिच्या या आगामी प्रोजेक्टची जोरदार चर्चा सुरु असातनाच तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती लोकप्रिय पुष्पा चित्रपट फेम ट्रेडींग गाणे बलम सामे सामे या गाण्यावर थिरकताना दिसली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ह्यातली गाणीही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत. यातलं अभिनेत्री रश्मिका मंदानावर चित्रित झालेलं बलम सामे..सामे हे गाणं तुफान हिट आहे. दरम्यान बिग बॉस मराठी सीझन 3 फेम मीरा जगन्नाथला हिला ही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरलेला नाही.
बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये आपल्या जबरदस्त खेळीने नेहमीच चर्चेत राहाणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडीयावर मीरानेसुध्दा नुकताच सामे सामेवर थिरकतानाचा जबरदस्त रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने हिरव्या रंगाची इरकली साडी परिधान केली आहे. तर हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.
मीरा लवकरच 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) मधील लोकप्रिय स्पर्धक जय दुधाणे (Jay Dudhane) सोबत दिसणार आहे. नुकतंच दोघांनी एका गाण्याचे शुटिंग पूर्ण केले आहे. बिग बॉसनंतर या स्पर्धकांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक फारच आतुर झाले आहेत. काहीदिवसांपूर्वी, मीरा आणि जयने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्यांनी एकेमकांचा हात धरलेला दिसून येत आहे. अतिशय रोमँटिक या फोटोमध्ये दोघेही फारच सुंदर दिसत आहेत.
बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन नुकताच पार पडला. सांगलीचा विशाल निकम या स्पर्धेचा महाविजेता ठरला. परंतु बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. प्रेक्षक या शो नंतरसुद्धा त्यांना तितकंच प्रेम देत आहेत.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.