आज बिग बाॅस मराठीच्या घरातून कोण पडणार बाहेर? चर्चा आहे 'या' नावाची!

आज बिग बाॅस मराठीच्या घरातून कोण पडणार बाहेर? चर्चा आहे 'या' नावाची!

काऊंटडाऊन सुरू झालंय. बिग बाॅस मराठीतून आज एक जण बाहेर पडणार. आता उरलेत 6 जण.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : काऊंटडाऊन सुरू झालंय. बिग बाॅस मराठीतून आज एक जण बाहेर पडणार. आता उरलेत 6 जण. आणि चर्चा आहे ती रेशम टिपणीसच्या नावाची. आज रेशम टिपणीस बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडणार म्हणे. खरं तर रेशम टिपणीस या शोचा मोठा टीआरपी. रेशम आणि राजेश श्रृंगारपुरेनं तर बिग बाॅस मराठी चांगलंच गाजवलं. रेशम, मेघा, स्मिता यांची भांडणंही चांगलीच रंगली.

मेघा आणि सईनंही रेशमवर वेगवेगळे आरोप केलेत. ती किचनमध्ये काम करत नाही, टास्कमध्ये भाग घेत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा

'ओडीआय'मध्ये धोनीचा मोठा पराक्रम; ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव!

गोवेकरांचं आणि क्रोशियाचं हे कनेक्शन तुम्हाला माहित आहे का?

मराठवाडा दौऱ्यातून होणार नव्या ठाकरेंची एण्ट्री; मनसेचा असेल हा मास्टर प्लॅन

बिग बाॅसच्या घरात आता सहा स्पर्धक राहिलेत. पुष्कर जोग आधीच ग्रँड फिनालेत पोचलाय. टिकट टू फिनाले टास्क त्यानं पूर्ण केल्यानं तो तिथं पोचलाय. आता राहिलेल्या मंडळींमधून कोण कोण फिनालेला पोचणार याची उत्सुकता आहे. पुढच्या आठवड्यात हा ग्रँड फिनाले रंगणार आहे.

गेल्या आठवड्यात मराठी बिग बाॅसच्या घरात हुकुमशाही गाजवणारा नंदकिशोर चौघुले आज घराबाहेर पडलाय. या आठवड्यामध्ये शर्मिष्ठा आणि नंदकिशोर चौघुले डेंजर झोनमध्ये आले होते. पणया आठवड्यामध्ये नंदकिशोर चौघुलेला घराबाहेर जावं लागलं. नंदकिशोर वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 04:23 PM IST

ताज्या बातम्या